सांगलीच्या ‘आधार’चा अंगावर येणारा ‘मधुमेह’ आणि अनिस जमादारांची भीष्मप्रतिज्ञा !


सांगलीच्या ‘आधार’चा अंगावर येणारा ‘मधुमेह’ आणि अनिस जमादारांची भीष्मप्रतिज्ञा!

— मेहबूब सर्जेखान :

हल्ली माणसाला ‘साखर’ म्हटलं की गोड वाटण्याऐजी धडकीच भरते. देवाच्या कपाळावरचा ‘टिळा’ आणि माणसाच्या रक्तातील ‘साखर’ या दोन गोष्टी कधी वाढतील याचा नेम राहिलेला नाही. एकदा का हा मधुमेह तुमच्या घरात शिरला, की तो घराच्या मालकापेक्षा जास्त हक्क गाजवू लागतो. तुमची बायको कदाचित तुमचं ऐकणार नाही, पण हा ‘डायबेटीस’ मात्र तुम्हाला बोटावर नाचवतो. “चहा घेऊ नका, पोळी अर्धीच खा, गुलाबाच्या फुलाकडे बघून लाडू खाल्ल्याचं समाधान माना…” अशा अटी घालत हा आजार तुमची अशी काही ‘पक्की मैत्री’ करतो, की जणू काही हा तुमच्या पूर्वजन्मीचा थकीत सावकारच असावा!

लोक या साखरेला आटोक्यात आणण्यासाठी काय काय पराक्रम करत नाहीत? सकाळी उठल्यापासून मैलोनमैल धावणारे लोक पाहिले की वाटतं, यांना ऑलिम्पिकमध्ये पाठवलं तर देश सोन्याने मढवून निघेल. पण हे बिचारे फक्त रक्तातील साखरेला घाबरून धावत असतात. खाणं इतकं कमी करतात की माणूस हळूहळू ‘उदबत्ती’ व्हायला लागतो आणि व्यायामाचा डोंगर मात्र ‘हिमालय’एवढा होतो. तरीही ती साखर काही केल्या कमी होत नाही. इन्सुलिनची इंजेक्शनं टोचून टोचून माणसाचं शरीर म्हणजे ‘टाचणीचा डबा’ बनून जातं, पण हा आजार मात्र शेवटपर्यंत पाठ सोडत नाही.

पण थांबा! आता सांगलीच्या मातीतून एक ‘रामबाण’ बातमी आली आहे. ‘आधार मधुमेह मुक्त अभियान’ या संस्थेने म्हणे या साखरेच्या राक्षसाला कायमचं गाडण्याचं ठरवलं आहे. या अभियानाचे सर्वेसर्वा अनिस जमादार यांनी तर थेट ‘भीष्मप्रतिज्ञा’च केली आहे! भीष्म पितामहाने राज्य सोडलं होतं, पण आमचे जमादार साहेब म्हणतात, “मी महाराष्ट्रच काय, पण संपूर्ण देशच मधुमेहमुक्त करणार!” वा! काय हा बाणा! महाराष्ट्राच्या मातीत अशा जिद्दी माणसांची वानवा नाही, हेच खरं.

त्यांनी म्हणे ‘Antox D’ आणि ‘Antox T’ नावाचा एक आयुर्वेदिक काढा शोधून काढला आहे. हा काढा म्हणजे साक्षात यमराजालाही ‘यू-टर्न’ घ्यायला लावणारा प्रकार दिसतोय. यामुळे शरीरात रक्ताची नाही, तर बळाची निर्मिती होते, प्रतिकारशक्ती वाढते आणि साखरेचा तो माजलेला हत्ती हळूहळू माणसाळू लागतो. विशेष म्हणजे, हा काढा काही जन्मभर घ्यावा लागत नाही. एकदा का त्याचं काम फत्ते झालं की औषध बंद! म्हणजे कसं, काम झालं की पाहुण्याने सन्मानाने निरोप घ्यावा, तसा हा प्रकार आहे.

आणि शेवटी काय राव, हा मधुमेहाचा राक्षस एकदा का मानगुटीवर बसला की माणसाचं आयुष्य म्हणजे ‘कडू कारल्याचं लोणचं’ होऊन जातं. पण सांगलीच्या या ‘आधार’ने आता आशेचा एक नवा किरण दाखवला आहे. अनिस जमादारांनी घेतलेली ही भीष्मप्रतिज्ञा म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर रक्तातील साखरेला सळो की पळो करून सोडणारा एक रणसंग्राम आहे!

जर ‘Antox’ D  व Antox T च्या एका काढ्याने माणसाच्या शरीरात पुन्हा हत्तीचं बळ येणार असेल आणि इन्सुलिनच्या टोचण्यांपासून सुटका होणार असेल, तर यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतं? कडू औषध घेऊन जर आयुष्य गोड होणार असेल, तर तो सौदा काय वाईट आहे? शेवटी काय, साखरेचा गोडवा रक्तात नको, तर तो माणसाच्या जिभेत आणि स्वभावात असायला हवा. जमादारांचा हा ‘आधार’ सर्वसामान्यांच्या आयुष्यातला कडवटपणा कायमचा संपवो आणि महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘मधुमेहमुक्त’ होवो, हीच सदिच्छा!

आता साखरेला सांगा – “चल फुट, आता आमचा ‘आधार’ खंबीर आहे!”

 

 


इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

इचलकरंजी महानगरपालिकेच्या ‘राधाकृष्ण’ पाणी योजनेविरोधात शिरोळ तालुक्यात जनआक्रोश! दानवाड पंचक्रोशीतील हजारो शेतकऱ्यांचे ‘आरपारच्या लढाई’चे रणशिंग; ऐतिहासिक कोपेश्वर मंदिरासह ६ जीवघेणे आघात अधोरेखित

43
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!