आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित होत फटाक्यांची आतिषबाजी व एकामेकाचे लाडु ने केले तोंड गोड .

प्रतिनिधी :
देहूरोड दि. :- राज्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानें कार्यकत्यांन मध्ये एकच उत्साह वाढलेला दिसून येते आहे सुमारे २० वर्ष पासुन वेगवेगळ्या राजकीय वाटांवर असलेले ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू होत्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक बळ मिळत होते अखेर दोन्ही बंधु एकत्र होऊन युतीची अधिकृत घोषणा होताच देहुरोड मध्ये मनसे शिवसेना उद्धव गट च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यां दोन्ही पक्षाची युती झाली याचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला देहूरोड शहरात ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौक येथे दिनांक २६/१२/२०२५ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता फटाक्यांची आतिषबाजी व लाडु पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आले यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थिती राहून आनंद उत्सव साजरा केला सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवसेनेचे जिल्हा सल्लागार रमेश जाधव व मनसे तालुका उपाध्यक्ष मोजेस दास व संदीप बालघरे यांनी पुष्पहार घालून सुरवात केले तर नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्यास जेष्ठ नेते विलास हिनुकुले देहुरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, मावळ तालुका सल्लागार अरुण गोंटे यांनी पुष्पहार अर्पण केले. सुभाषचंद्र बोस चौकात रमेश जाधव, मोजेस दास, सुनंदाताई आवळे, अरुण गोंटे यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.युतीची घोषणा होताच कार्यकर्त्याचा आनंद गगणाला भिडले होते जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना लाडू भरून जल्लोष केला यावेळी सनी कदम, उपशहर प्रमुख विजय थोरी, गणेश सावंत, विभाग प्रमुख अमित पिंजण, विष्णू ,श्रीमती लक्ष्मी अक्का मिनगी,दिवसें सुतार अण्णा,डाॅमनिक दास, जॉन थॉमस, डेव्हिड आरिकानंदन, अविनाश अगणे, मनिष डिकावं, मनसे सैनिक विलसन प्रकाश, जेष्ठ शिवसैनिक बसवराज कोरे, पांडुरंग बालघरे, मोरेश्वर घाडगे, गोपीनाथ चोरघे उप विभाग प्रमुख, विजय दांगट सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


























