अतिग्रे ग्रामसभेत थकीत घरफाळा करास २५% सवलत मंजूर
अतिग्रे प्रतिनिधी भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेत थकीत घरफाळा करास २५% सवलत देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्याची माहिती सरपंच सुशांत वड्ड यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरफाळा व कर थकबाकी वसुलीसंदर्भातील शासन मार्गदर्शक सूचना मांडण्यासाठी ०८ डिसेंबर २०२५ रोजी ही सभा घेण्यात आली होती.

ग्रामपंचायत अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी शासन निर्णय व विषयपत्रिकेचे वाचन केल्यानंतर सभेत शासनाच्या ५०% कर सवलतीच्या प्रस्तावास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला. नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. चर्चेनंतर थकीत घरफाळा करास २५% सवलत देण्याचाच निर्णय योग्य असल्याचे एकमताने ठरविण्यात आले.
यावेळी सरपंच सुशांत वड्ड, ग्रामपंचायत उपसरपंच, कलावती गुरव, सदस्य भगवान पाटील, अनिरुद्ध कांबळे, बाबासो पाटील, नितीन पाटील, सदस्या कल्पना पाटील, छाया पाटील, दिपाली पाटील, आक्काताई शिंदे , माजी सरपंच श्रीधर पाटील, ‘जय जवान जय किसान’ आघाडीचे तानाजी पाटील, भाजप शाखाध्यक्ष रामचंद्र पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष दीपक पाटील, तसेच मोहन शिरगावे, पंडित पाटील, उत्तम पाटील,भरत शिंदे, प्रज्योत सूर्यवंशी, विजयकुमार गोंधळी, बाबासाहेब शिंदे, सारंग पाटील, डॉ. एस. आर. पाटील, व्ही. एम. पाटील, विजय चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सवलत ही १ एप्रिल २०२५ पूर्वीच्या फक्त निवासी इमारतींवरील घरफाळा थकबाकीपुरती मर्यादित राहणार असून, सन २०२५–२६ चा संपूर्ण कर १००% भरलेल्या खातेदारांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत घरपट्टी न भरल्यास संबंधितांचे पाणी कनेक्शन बंद होणार असून, शासकीय लाभही मिळणार नाही. असे सरपंच सुशांत वड्ड यांनी मांडले






























