इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बाबासो राजमाने, उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे यांची एकमताने निवड

इचलकरंजी : इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठीच्या अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
पत्रकार कक्षात कार्यकारिणीची घोषणा
नूतन कार्यकारीणीच्या निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पत्रकार कक्षात पार पडली. मावळते अध्यक्ष अतुल आंबी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
यावेळी बैठकीस अनिल दंडगे, पंडीत कोडेकर, अतुल आंबी, शितल पाटील, बसवराज कोटगी, डॉ. पांडुरंग पिळणकर, महेश आंबेकर, इराण्णा सिंहासने, शिवानंद रावळ, विजय चव्हाण, भाऊसाहेब फास्के, छोटूसिंग रजपूत, संभाजी गुरव, महावीर चिंचणे आदी पत्रकार सदस्य उपस्थित होते.
पुष्पगुच्छ देऊन सत्कार
निवडीनंतर लगेचच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित सदस्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बाबासो राजमाने आणि सुभाष भस्मे यांच्या निवडीबद्दल पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.



























