देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात इतिहासात पहिल्यांदा मराठी भाषा गौरव दिन साजरा. मनसेचे पत्राचे दखल घेत मराठी भाषा गौरव दिन साजरा. 


यापुढे मराठी भाषा गौरव दिन प्रत्येक वर्षी अभिमानाने साजरा करू :- कार्यालियन अधिक्षक अजय चौधरी. ‌

देहुरोड दि:- २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन पहिल्यांदा कॅन्टोन्मेट बोर्ड यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक करताना कॅन्टोन्मेट बोर्ड कार्यालयाचे सुनिल गुरव यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत आज मराठी भाषा गौरव दिवस मराठी म्हणजे गोडवा, मराठी, म्हणजे प्रेम, मराठी भाषा म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, भाषा असल्याचे म्हणत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत प्रताविकेत उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा सुनिल गुरव यांनी दिल्या,

सर्व प्रथम सभागृहात असलेले यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला कार्यालियन अधिक्षक अजय चौधरी सुनिल गुरव यांनी पुष्पहार अर्पण केले तर वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेला अधिक्षक अजय चौधरी, सुनिल गुरव कॅन्टोन्मेट बोर्ड चे निवासी अधिकारी डॉ श्रीनिवास चाटे धनाजी मुळीक प्रविण गायकवाड विक्रम जाधव यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले २७ फेब्रुवारी विष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्या जन्मदिवस वि. वा. शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार व समीक्षक विष्णू वामन शिरवाडकर यांचें टोपणनाव कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले वि. स. खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्यक ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारीला झाल्याने मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असे सुंदर शब्दात वर्णन करत सुनिल गुरव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यालयाचे धनंजय मुळीक यांनी मला अत्यंत आनंद होत आहे ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या गाथाने पावन झालेल्या या भुमित आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहोत हे सर्वान साठी अभिमानाची गोष्ट आहे असे मनोगत व्यक्त करत मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राजु जाधव यांनी कुसुमाग्रज यांच्या बद्दल म्हणताना सांगितले वामन शिरवाडकर हे सहा भावंडे त्यात त्यांची एक लाडकी बहीण असल्याने कुसुमाग्रज हे टोपणनाव वामन शिरवाडकर यांना मिळाले आज आपण मराठी भाषा बोलतो यांचे अभिमान तर आहेच पण मराठी भाषा आज जपान सह अनेक परदेशी लोक सुद्धा मराठीमध्ये बोलताना दिसतात हे आपल्याला साठी अभिमानाची गोष्ट आहे .

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बाबत प्रदेशातील लोकांचें कौतुक केले असेच आपण सर्वांनी देखील याचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे आज मराठी भाषा गौरव दिन कॅन्टोन्मेट बोर्ड यशवंतराव चव्हाण सभागृहात साजरा होत आहे हे आनंदीची गोष्ट आहे, असे मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यालियन अधिक्षक अजय चौधरी यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले आजचा दिवस हे आनंदाचे दिवस यापुर्वी आपल्या कार्यालयात प्रत्येक महापुरुषांचे जयंती साजरा करण्यात येते आज पहिल्यांदाच कवीवर्य शिरवाडकर यांच्या जन्मदिवस निमित्ताने आपण आपल्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करत आहे पुढे म्हणताना म्हणाले सार्वजनिक सुट्टी असले तरी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित जणांना दिले खरं तर मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास यांनी कौतुकास्पद काम केले त्यांनी मनसेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात यावा असे पत्र दिले याचा आम्हाला ही आनंद झाला आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला यापुढेही कायम मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कॅन्टोन्मेंटच्या कार्याल्यात आणि महात्मा गांधी शाळेत हा दिवस साजरा करू अशी ग्वाही उपस्थित मान्यवराना दिली. यावेळी पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांनी उपस्थित मान्यवरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देत मराठी भाषा हे संस्कृतीचे इतिहासाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे मराठी भाषेची निर्मिती इ स १० ते १२ व्या शतकात मराठी भाषेला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झाले मराठी भाषा हे यादवकालीन शिलालेख आणि साहित्य मध्ये मराठी भाषेचे स्वरूप दिसून येते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज यांनी आपल्या अभंग आणि भारुडच्या माध्यमातून मराठी भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या संतांनी केले आहे तसेच लोकमान्य टिळकांनी आपल्या लेखनातून व पत्रकारीतेच्या माध्यमातून राष्ट्रीय जाणीव करून दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासन काळी मराठी भाषा प्रशासनाची भाषा बनवली म्हणून आज राज्य कारभारात पत्र व्यवहारात आणि शासन निर्णयात मराठी भाषा प्रभावीपणे वापरले जाते म्हणून मराठी भाषा हे स्वाभिमानाचे प्रतीक आहे असे मनोगत व्यक्त केले यावेळी मनसेचे नेते मोझेस दास यांनी देखील आम्ही दिलेल्या पत्राचे आपण आनंदाने स्विकारून मराठी भाषा गौरव दिवस साजरा केला या बद्दल आम्ही देखील आभारी आहे असे उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना पेढे वाटप करून तोंड गोड करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले तर वैभव नगराळे यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देत आभार प्रकट केले. यावेळी डी आर कदम, सुभाष मोरे, दिपक अडसूळे , राजेंद्र जाधव, विवेक राऊत, दिपक कुंभार, अंजुम खान शेख, अस्मिता नवले सरोज तेलगु तर कर्मचारी वर्ग वैभव नगराळे, विवेक काळे, अजय ओळीवकर, प्रशिक भगत, विशाल भारद्वाज, गणेश आढाव, विकास गायकवाड, मलेश हेगडे, योगेश अभ्यंकर सह पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे रामचंद्र बालघरे, प्रफुल्ल देशमुख हे सुरक्षा रक्षक उपस्थित होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, मानव आधार सामाजिक संघचे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर सामाजिक कार्यकर्ता इरप्पा तेलगु हे उपस्थित होते.

 श्री शिवाजी विद्यालय महात्मा गांधी शाळा आणि देहूरोड पोस्ट ऑफिस मध्ये देखील साजरा करण्यात आला 

32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!