कोरोचीच्या आखाड्यात विकासाचे ‘इंजिनिअर’; आता गल्लीचं डिझाइन अन् दिल्लीची साथ !


कोरोचीच्या आखाड्यात विकासाचे ‘इंजिनिअर’; आता गल्लीचं डिझाइन अन् दिल्लीची साथ!

कोरोची :  निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला की आश्वासनांचे पेव फुटते; पण कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या आखाड्यात मात्र यंदा विकासाचे ‘ब्लू-प्रिंट’ आणि सुशिक्षित तरुणाईची उमेद घेऊन ‘महायुती’ मैदानात उतरली आहे. निमित्त होते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विराट सभेचे! ‘नारीशक्तीचा सन्मान’ आणि ‘लाडक्या बहिणींचा जागर’ करत कोरोचीच्या मातीत जणू परिवर्तनाचे रणशिंगच फुंकले गेले.

सुशिक्षित उमेदवारांची ‘त्रिमूर्ती’ आणि ‘नंबर एक’चा योग !

सभेचा माहोल असा की, समोर जनसमुदायाचा महासागर आणि मंचावर अनुभवी नेत्यांसह उच्चशिक्षित तरुणाई. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आपल्या खास शैलीत गुपित फोडले की, योगायोगाने महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा मतपत्रिकेवरील क्रमांक ‘एक’ आहे! “ज्यांचा क्रमांक एक, त्यांचा निकालही एक नंबरच लागणार!” हा त्यांचा विश्वास टाळ्यांच्या कडकडाटात न्हाऊन निघाला. सानिका राहुल आवाडे, सुमेध ओऊळकर आणि प्रियांका खोबरे हे तिन्ही उमेदवार ‘इंजिनिअर’ आहेत. आता राजकारणाच्या खड्ड्यात रस्ते बांधायचे की विकासाचे नवे ‘डिझाइन’ आखायचे, हे या इंजिनिअर उमेदवारांना नक्कीच ठाऊक आहे.

सानिका आवाडे : विकासाचा वारसा अन् भविष्याची दृष्टी आमदार राहुल आवाडे यांची ‘लाडकी लेक’ आणि प्रकाशआण्णांची नात कु. सानिका आवाडे हिने आपल्या भाषणात विकासाचा पाढा वाचला नाही, तर भविष्याचा वेध घेतला. रस्ते, पाणी, गटरी ही कामे तर सुरूच आहेत, पण उद्याच्या कोरोचीसाठी ‘स्किल डेव्हलपमेंट’ आणि महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचे स्वप्न तिने मांडले. सानिकाच्या रूपाने आवाडे आणि यड्रावकर अशा दोन मातब्बर राजकीय घराण्यांचा वारसा आता जनसेवेसाठी सज्ज झाला आहे.

प्रकाश आण्णांचे ‘व्हिजन’: विकासाचा महामार्ग माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांनी मोदीजींच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा धागा पकडत, ग्रामीण भागाच्या उत्थानाचा मंत्र दिला. “लाडकी बहीण योजना जोपर्यंत महायुती आहे, तोपर्यंत कधीच बंद होणार नाही,” अशी ग्वाही देतानाच, महिलांना १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज आणि त्याचे व्याज सरकार भरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अण्णांचे भाषण म्हणजे अनुभवाचा आणि विकासाच्या जिद्दीचा जणू ‘हुकमी एक्का’च!पी

मी शब्द दिला की पाळतो’ – एकनाथ शिंदे यांचा निर्धार सभेचा कळस गाठला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फटकेबाजीने! “मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांत योजनांचा पाऊस पाडला. लाडकी बहीण योजना ही केवळ घोषणा नाही, तर माझ्या बहिणींच्या सन्मानाचा आधार आहे,” असे म्हणत त्यांनी या योजनेचे मानधन २१०० रुपये करण्याचा शब्द दिला. “एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे,” या त्यांच्या वाक्यावर कोरोचीकरांनी एकच जल्लोष केला. “महायुतीला मत म्हणजे विकासाला मत,” असा मंत्र देत त्यांनी ७ तारखेला ‘कमळा’चे बटन दाबण्याचे आवाहन केले.

या सभेला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार डॉ. राजेंद्र पाटील, आमदार डॉ. अशोकराव माने यांसह महायुतीचे दिग्गज नेते आणि हजारोंच्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!