आर एम हायस्कूल विद्यालयास पोलीस इन्स्ट्रक्टर सौ उज्वला कारंडे यांची सदिच्छा भेट
सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ 
आर एम हायस्कूल विद्यालयात पोलीस इन्स्ट्रक्टर सौ उज्वला कारंडे यांची सदिच्छा भेट उत्साहात पार पडली त्यांच्या आगमनानंतर मुख्याध्यापक श्री भातमारे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

विद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन वाहतूक सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सौ उज्वला कारंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाहतूक नियमाचे पालन का आवश्यक आहे अपघातांचे वाढते प्रमाण व त्यांची कारणे तसेच जीवन किती अमूल्य आहे आणि थोड्याशा निष्काळजीपणामुळे होणारे मोठे परिणाम याबद्दल अत्यंत प्रभावी आणि उदाहरणासहित मार्गदर्शन केले त्यांनी वाहन चालवताना हेल्मेट सीट बेल्ट वेग मर्यादा ओव्हरटेकिंगचे नियम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले ओव्हरटेकिंग करत असताना त्यांच्या डिपारमेंट मधील महिला कर्मचारी चा कसा अपघात झाला याबद्दल सविस्तर माहिती मुलांना समजावून सांगितली. तसेच व्यसनाच्या धोक्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली तंबाखू सिगरेट दारू आणि अशा घातक व्यसनापासून दूर राहण्याचे आव्हान करीत त्याने तरुणाईच्या आरोग्यावर आणि भवितव्यावर त्याचे गंभीर दुष्परिणाम स्पष्ट केले.
यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ट्राफिक कवायत करून दाखवले सावधान विश्राम सॅल्यूट आहे दाहे बाहे पीछे मूड इत्यादी आज्ञा कशा द्यायच्या त्यावर शरीराची हालचाल कशी असते आणि शिस्त कशी पाळायचे याबाबत त्यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले विद्यार्थ्यांनीही उत्साहपूर्ती सहभाग नोंदवत अचूक हालचालीचा सराव केला.
सौ कारंडे मॅडम यांनी पोलीस विभागातील शिस्त वेळेचे महत्व जनसेवेची भावना आणि नागरिक म्हणून कर्तव्य भावना जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यावर सकारात्मक छाप पडली कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक श्री मासाळ सर आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम, आर एस पी शिक्षक सोपान भोसले सर ,राजू शिंदे सर, प्रसाद पवार सर, कोकरे मॅडम, पवार मॅडम, थोरात मॅडम, सगरे मॅडम वासुदेव मॅडम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रसाद माने यांनी केले.






























