माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेने आणली मयत सभासदांच्या टाळूवरचे लोणी खाणारी योजना
सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ
माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्यासर्व सभासदांना नम्रतेची विनंती की माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या संचालक मंडळाने जी नवीन जीवन संजीवनी योजनेची दुरुस्तीचे परिपत्रक काढून 1नोव्हेंबर 2025 पासून ही योजना प्रत्यक्ष लागू करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ही योजना म्हणजे मयत सभासदांच्या टाळूवरचं लोणी खाणारी योजना आहे .कारण आपली पतसंस्था ही कर्ज देतानाच कर्जाच्या प्रमाणात जीवन संजीवनी योजनेची रक्कम कर्जातूनच वसूल करून घेते आणि दुर्दैवाने जर का एखाद्या सभासदाचा मृत्यू झाला तर त्याचे पूर्ण कर्ज माफ होते अशी तरतूद असताना आत्ता या संचालक मंडळाने या योजनेमध्ये बदल करून जर का एखादा सभासद दुर्दैवानं मृत्यू झाला तर त्या सभासदांच्या कर्जाची वसुली ही सर्वप्रथम त्याचे शेअर्स त्याची कायम ठेव, सभासद ठेव या ठेवी सर्वप्रथम कर्जाला वर्ग करून त्यानंतर उर्वरित कर्ज हे जीवन संजीवनी ठेव योजनेतून परतफेड करून घेतले जाईल व जी काही जीवन संजीवनी ठेव योजनेत रक्कम उरेल त्यास 100 स 1500 रुपये प्रमाणे लाभ मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना देण्यात येतील
अशा प्रकारची योजना दुरुस्ती या संचालक मंडळाने जाहीर केलेली आहे .याचा अर्थ असा आहे की जीवन संजीवनी ठेव योजने मधून पूर्णपणे कर्ज माफ होत असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्यांचे शेअर्स कायम ठेवी कर्जाला वर्ग करून घेऊन वारसांना कोणत्याही प्रकारची देणे लागू नये अशा प्रकारची व्यवस्था आपल्या पतसंस्थेने केलेली आहे तसेच कर्जदार सभासद व बिगर कर्जदार सभासद असा भेदभाव सुद्धा या संचालक मंडळाने केलेला आहेकर्जदार सभासदास 100 रुपयात 3000 रुपये अशी तरतूद तर बिगर कर्जदार सभासदास 100 रुपयात 1500 रुपये अशी तरतूद केली आहे .तरी त्यास बहुतांशी सभासदांनी विरोध दर्शवलेला आहे कारण हा नियम म्हणजे आपली संस्था बंद पाडण्यासाठी काही लोकांनी चालवलेला उद्योग आहे ज्यांचा संस्थेशी काही संबंध नाही याचे कोणतेही लाभ आपणास मिळणार नाहीत
अशा असणाऱ्या लोकांनी हा निर्णय घेऊन संचालक मंडळाच्या माथी मारलेला आहे ,तरी सर्व सभासदांनी यास मोठ्या hi प्रमाणात विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे जर का हा निर्णय येत्या पंधरा दिवसात बदलला नाही तर माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेच्या सर्व शाखांच्या समोर व जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर सर्व सभासदांसह मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल . असे इशारा वजा निवेदन आपल्या पतसंस्थेचे चेअरमन ,सचिव यांना दिलेले आहे .जर का या मागणीचा विचार नाही झाला तर येत्या पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे अशा आशयाचे निवेदन संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री शश्वरे सर यांना देण्यात आले .































