कर्जत तालुक्यातील अंजप व कोदीवले हद्दीत गोवंशीय जनवरांची चोरी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी जेरबंद केले 


कर्जत तालुक्यातील अंजप व कोदीवले हद्दीत गोवंशीय जनवरांची चोरी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी जेरबंद केले 

प्रेस मीडिया लाईव्ह

सुनील पाटील

नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कोदिवले गावाच्या हद्दीत गोवंशीय बैल चोरून त्याची कत्तल करून त्याचे मांस विक्री करीता घेऊन गेलेल्या आरोपीचा नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुशील काजोळकर व पोह/2384 वाघमारे, पोशि/1836 केकाण, पोशि/467 बेंद्रे, पोशि/1415 वांगणेकर यांनी तांत्रिक तपास व गोपनीय बातमी दारामार्फत शोध घेऊन आरोपी यास भिवंडी जि. ठाणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

अटक आरोपी याचेकडे केलेल्या तपासा मध्ये त्याने नेरळ पोलीस ठाणे हद्दीत कोदिवले व कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील अंजप या ठिकाणी गोवंशीय जनावारांची चोरी करून कत्तल केली असल्याची कबुली दिली आहे. उर्वरीत आरोपी शोधण्यासाठी टीम रवाना झाली असून पुढील तपास चालू आहे


50
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!