अल्पसंख्याक महिलांचा वज्रनिर्धार: वक्फ बोर्डाच्या हुकूमशाहीला आता जनशक्तीचा दणका.!


विद्यापीठ द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा ; १६ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कचेरीवर धडकणार जनसागर.!

पुणे : “अन्यायाची राजवट कितीही मोठी असली, तरी जनशक्तीच्या एका तडाख्याने ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याशिवाय राहत नाही!” आचार्य अत्रे यांच्या या वाक्याची प्रचिती आता अल्पसंख्याक महिलांच्या आंदोलनातून येत आहे. महिला शिक्षण आणि स्वतंत्र ‘अल्पसंख्याक महिला विद्यापीठा’च्या मागणीसाठी समाजातील रणरागिणींनी आता वक्फ बोर्डाच्या हुकूमशाहीविरुद्ध शड्डू ठोकला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या या असंतोषाचा आता वणवा पेटला असून, या लढाईचा निकाल आता मैदानातच लागणार आहे.

वक्फ बोर्डाच्या ‘धृतराष्ट्रां’ना इशारा..!

वक्फ बोर्डाकडे मालमत्तांची कमतरता नाही, पण जेव्हा समाजाच्या मुलींच्या शिक्षणाचा आणि विद्यापीठाचा प्रश्न येतो, तेव्हा या सत्ताधाऱ्यांना बहिरेपण येते. या ढोंगी कारभाराचा बुरखा फाडण्यासाठी आता महिलांनी घर सोडून रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. ५ फेब्रुवारीची बैठक ही केवळ रणनीती नव्हती, तर ती या हुकूमशाहीच्या अंताची नांदी ठरली आहे. ‘शिक्षण हक्क मंचा’चे संस्थापक मतीन मुजावर यांनी यावेळी ठणकावून सांगितले की, “शिक्षण हाच प्रगतीचा एकमेव मार्ग आहे आणि तो आम्ही खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही!”

आंदोलनाचा पहिला अंक :
१६ फेब्रुवारी! येत्या १६ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या संघर्षाची पहिली ठिणगी टाकली जाईल. त्यानंतरही जर प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत, तर मुंबईचे आझाद मैदान आंदोलकांच्या महासागराने व्यापून जाईल. जेल भरो, चक्का जाम आणि रेल रोकोच्या माध्यमातून सरकारला गुडघ्यावर आणण्याचा निर्धार या रणरागिणींनी केला आहे.

क्रांतीचे शिलेदार :

या ऐतिहासिक बैठकीत किरण शेख, आयेशा शेख, डॉ. नसरीन शेख, रजिया बेगम, ॲड. अफरोज सय्यद, डॉ. महेजबीन कुडसी यांसारख्या विदुषींनी आणि मतीन मुजावर यांच्यासह चांदभाई बळबट्टी, फिरोज मुल्ला, अकबर खान सर यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या लढ्याला धार दिली आहे.

मीडियाचा खास ठसका :

अरे, ज्या समाजाच्या माता-भगिनी रस्त्यावर उतरतात, तेव्हा समजून जावे की परिवर्तनाची लाट आता कोणालाही थांबवता येणार नाही. मशिदीतून आता केवळ प्रार्थनेचे सूर नव्हे, तर शिक्षणाच्या क्रांतीचे हुंकार उमटले पाहिजेत. वक्फ बोर्डाने आता एकतर सुधारणा करावी, नाहीतर जनशक्तीच्या प्रलयाला सामोरे जाण्यास तयार राहावे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!