सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र येऊन वर्धापन दिन साजरा करा :- सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर –
– नायब तहसीलदार जयराम देशमुख :- आलेल्या भाविकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक, काही सुचना असेल तर लेखी स्वरूपात द्या.
– देहूरोड दि.:- देहुरोड पोलीस ठाण्यात धम्मभुमीच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त बैठक आयोजित करण्यात आले होते यावेळी सर्व सामाजिक संघटना विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय पक्षाचे आजी-माजी नेते उपस्थित होते

सुरूवातीला देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व सुचना मांडताना म्हणाले वर्धापन दिनानिमित्त सर्वांनी गुण्यागोविंदाने कार्यक्रम पार पाडा या ऐतिहासिक कार्यक्रमाला कुठलेच गालबोट लागू नये याची खबरदारी सर्व समिती पक्ष संघटनेने घेतले पाहिजे विहाराच्या ठिकाणी कोणी ही मोठ्या बॅनरवर मंडपावरुन जागे वरून वाद घालू नये

आमची मोठी संघटना आहे तुमची छोटी आम्ही पहिल्यापासून आहे हे चालणार नाही, ते आम्ही पोलीस चालू देणार नाही असे म्हणत कोणीही वाद न घालता हा कार्यक्रम गुण्यागोविंदाने पार पाडा तसेच कोणी ही जबरदस्तीने वर्गणीचा तगादा लावू नका जे देणगीदार देतील ते घ्या जर तक्रार आली तर खंडणीचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो असे उपस्थितांना सूचना दिल्या.
बुद्ध विहार समितीच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे यांनी येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्या जाण्या साठी बुद्ध विहार च्या वतीने जय्यत तयारी केली आहे आणि गेल्या वर्षी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पाणी शौचालयाचे नीट व्यवस्था केली नव्हती यंदाच्या वर्षी लाईट पाणीपुरवठा शौचालयाचे नीट व्यवस्था झाली पाहिजे आणी बुद्ध विहार येथे येणाऱ्या लोकांना रस्ता नीट नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे तर कार्यक्रमाचा अगोदर कॅन्टोन्मेंट बोर्डाने संपूर्ण रस्ता डांबरीकरण करावे अन्यथा मी २६ डिसेंबर रोजी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयांवर मी आंदोलन करणार असे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना दिल्या. भाजपा शहराध्यक्ष रघुवीर शेलार यांनी देहूरोड शहरात आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो व कुठलेही सण असो पोलीस प्रशासनाच्या वतीने चांगले प्रकारचे कार्यक्रम पार पडला जातो यंदा वर्धापन दिनाला देखील पोलिसांच्या वतीने चांगले सहकार्य लाभेल बुद्ध विहार येथे चार दिवस अगोदर साफसफाई व पथरीले वाल्यांना व्यवस्थित मैदानात उपलब्ध करून आपले दुकान दुकान मांडावे यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपले सुरक्षारक्षकांना चार दिवस अगोदर या कामाला लावावे जेणे करून येणारा भाविकांना गैरसोयी उपलब्ध होणार नाही रस्ता ही मोकळा होईल असे सुविधा केले पाहिजे असे सुचविले. बुद्ध विहार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष टेक्सास गायकवाड यांनी अष्टप्रधान मंडळ च्या वतीने सूचना मांडताना म्हणाले प्रत्येक वर्षी कार्यक्रम भव्य दिव्य होत असतो सूचना मांडताना त्यांनी पोलिसांना सांगितले की ऐतिहासिक बुद्धविहार येथे काही छोटे मोठे पुस्तक विक्रेते व खाऊ इतर साहित्य विकणारे यांच्याकडून काही फायदा घेणारे मंडळी हे पैसे उकळतात जर पोलिसांनी यावर लक्ष केंद्रित केले तर बरे होईल या गोरगरीब वाल्याकडून कुठले ही पावती न फाडता त्यांना व्यवसाय विक्री करू द्यावे जर कोणी जोर जबरदस्तीने पैसे घेतले तर त्यांच्यावर योग्य ते कारवाई करा असे सुचना केले.आरपीआयचे (आ गट) सुनील कडलक यांनी पोलीस प्रशासनाला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना गैरसोयी होऊ नये म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने पार्किंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावे पुणे येथून येणारे वाहन कॅन्टोन्मेंट च्या महात्मा गांधी शाळेच्या इथे पार्किंग करावा व लोणावळा कडुन येणाऱ्या भाविकांना कॅन्टोन्मेंट च्या हास्पीटल च्या मैदानावर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी सुचना मांडल्या.
रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दरवर्षी सालाबाद प्रमाणे पक्षाच्या वतीने आम्ही भव्य दिव्य मांडव घालून भोजनदान करीत असतो यंदाही भोजनदान पाणी याची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देणार आहे आणि सर्वांनी मतभेद न करता कुठलेही गाळगोट न लावता सर्वांनी कार्यक्रम पार पाडू अशी गवई पोलीस व उपस्थित त्यांना दिली. संविधान सन्मान संघ चे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी शहरात विविध पक्ष संघटना सामाजिक संघटना यांनी आप आपले हेवे दिवे बाजूला ठेवून येणाऱ्या कार्यक्रम पार पाडावा सर्वांनी आप आपल्या समिती पक्ष संघटनेच्या वतीने येणारा भाविकांना सुख सुविधा आपणही उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कुठल्याही प्रशासनावर ताण पडणार नाही संविधान सन्मानच्या वतीने आम्हीही भोजनदान पाणी वाटप कार्यक्रम करणार आहे यावेळी सर्वांना वर्धापन दिनाच्या व नाताळाचा नवीन वर्षाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोजेस दास यांनी देहूरोड सर्व जाती धर्माचे शहर आहे या शहराला मिनी इंडिया असे संबोधले जाते येथे राजे छत्रपती शिवाजी जयंती, आंबेडकर जयंती, गणेश उत्सव सर्व लोक मिळून करतात आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला गालबोट लागलेल्या नाही आणि लागणारी ही नाही देहूरोड शहरात कधी ही कुठले ही अनुचित प्रकार घडलेले नाही आणि घडणारी नाही यांचे मुख्य कारण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे साहेब यांनी सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः जाऊन उपस्थित राहून काम पाहतात व पोलिसांचा मोठा बंदोबस लावून कार्यक्रमाला साथ देतात त्यामुळे कुठलेही कार्यक्रमाला आजपर्यंत गालबोट लागलेला नाही असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार अनिस शेख यांनी तेलकट पदार्थ बनविण्ऱ्यानी एलपीजी गॅस वापरताना अग्निशामक यंत्र जवळ बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून कुठले ही अप्रिय घटना घडु नये तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांचा ताफा सहित कार्डीयक रूग्णवाहिका प्रशासनाने उपलब्ध करून द्यावे तसेच हेलियम गैसचे फुगे विक्री करणारे व्यक्तींना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून थांबवावे अशी सूचना मांडली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी सर्वांचे सूचना ऐकल्यानंतर यंदाचा कार्यक्रम हा शांतताने पार पाडावे, येणारा भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे नेत्यांनी आपल्या आपल्या परीने चौक काम करावे, कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे येणाऱ्या वर्धापन दिनाच्या नाताळाचा व नवीन वर्षाच्या मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो असे मनोगत व्यक्त केले. नायब तहसीलदार जयराम देशमुख यांनी आजच्या बैठकीत आलेल्या सर्व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खूप छान सुंदर सूचना मांडले आहेत ते पूर्ण करण्याचा पुर्णपणे प्रयत्न करू पाणी लाईट शौचालय हे सुख सुविधा पुरवणे हे आवश्यक आहे जेणेकरून भाविकांना कुठल्याच प्रकारचे अडचण होणार नाही याची दक्षता आपण घेऊ जे जे आवश्यक गोष्टी आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणखी काही अडचण असतील ते आम्हाला लेखी देऊन कळवा निश्चित समाधान करू वर्धापन दिनाच्या व तसेच नाताळाचे व नवीन वर्षाच्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या या वेळी नायब तहसीलदार जयराम देशमुख, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर, आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार, लोहमार्गचे जीआरपी श्री चौबे, देहूरोड पोलीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल गजरमल ,ग्राम महसुल अधिकारी रविंद्र मोहरूत, देहूरोड विभागाचे मंडळ अधिकारी वैभव भुतेकर, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, यावेळी देहूरोड शहरातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






























