प्रवाशांचा जीव धोक्यात ! नारायणगाव आगारातील एसटी बसची दुरवस्था; ‘सुरक्षित प्रवास’ ब्रीदवाक्याचे धिंडवडे


प्रवाशांचा जीव धोक्यात ! नारायणगाव आगारातील एसटी बसची दुरवस्था; ‘सुरक्षित प्रवास’ ब्रीदवाक्याचे धिंडवडे

नारायणगाव : “लालपरी” अर्थात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, नारायणगाव बस डेपोमध्ये पाहायला मिळालेल्या एका बसच्या भीषण अवस्थेमुळे एसटी प्रशासनाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारे प्रशासन त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप आता प्रवाशांकडून केला जात आहे.

प्रवाशांनी मांडली व्यथा

शुक्रवार, दिनांक १९.१२.२०२५ रोजी पहाटे ५:३० वाजता (शनिवार, २०.१२.२०२५ च्या सुमारास) नारायणगाव डेपोमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसची अवस्था अत्यंत दयनीय होती. बसचे पत्रे निघालेले, इंजिनचा आवाज आणि मोडकळीस आलेली अंतर्गत व्यवस्था पाहून ही बस रस्त्यावर धावण्यास योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “महाराष्ट्र एसटी बसचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास” हे ब्रीदवाक्य केवळ कागदावरच उरले आहे का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का..?

या गंभीर प्रकाराबाबत जागरूक प्रवासी श्री. सचिन बाळकृष्ण गोवेकर यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “आरटीओ रस्त्यावरील खाजगी दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी वाहनांचे आयुष्य संपले की त्यांच्यावर तात्काळ बंदी घालते. मात्र, एसटी महामंडळाच्या या भंगार अवस्थेतील गाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या बसमुळे एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?”

मुख्यमंत्र्यांकडे आणि मंत्र्यांकडे मागणी

ही माहिती एसटी बस संघटना, परिवहन मंत्री आणि प्रशासकीय अधिकार्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. मोडकळीस आलेल्या अशा सर्व बसेस तातडीने बंद करून प्रवाशांना नवीन आणि सुरक्षित बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी श्री. गोवेकर यांनी केली आहे.श्री. गोवेकर यांनी ही माहिती लेखी स्वरूपात प्रेस मीडिया लाईव्ह कडे व्हॉट्स अप वर पाठवली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:  तक्रारदार सचिन बाळकृष्ण गोवेकर संपर्क नंबर :- ७०४५४५४८७५

 

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!