पुणे महापालिका निवडणूक : इच्छुकांचा रेकॉर्ड ब्रेक उत्साह


पुणे महापालिका निवडणूक : इच्छुकांचा रेकॉर्ड ब्रेक उत्साह , 

भाजपला २३०० अर्ज; युतीच्या चर्चेने मनसेचा अर्ज वाटपाचा वेग ‘सुसाट’ 

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी  अखेर मुहूर्त लागल्याने राजकीय वर्तुळात आणि इच्छुकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये यंदा सर्वाधिक इच्छुकांनी अर्ज दाखल करत रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे (BJP) तब्बल २३०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एका जागेसाठी सरासरी १४ उमेदवार शर्यतीत असल्याने भाजपमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

मनसेचा ‘सुसाट’ वेग : युतीच्या चर्चेने इच्छुकांमध्ये उत्साह

भाजपपाठोपाठ अर्ज वाटपाच्या आणि अर्जांच्या प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘इंजिन’ देखील सुसाट धावताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये  दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना आणि मनसे एकत्रित युती करून महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार, या पार्श्वभूमीवर मनसेच्या इच्छुकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. इतर प्रमुख पक्षांच्या तुलनेत भाजप नंतर मनसेच्या अर्ज वाटपाचा वेग अधिक असल्याने, मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

 

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!