पुणे महापालिकेचा कडक पवित्रा: ‘नो परमिशन, नो होर्डिंग’ – आचारसंहिता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल!


पुणे महापालिकेचा कडक पवित्रा: ‘नो परमिशन, नो होर्डिंग’ – आचारसंहिता भंग केल्यास थेट गुन्हे दाखल !

पुणे, :  लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या काळात लागू असलेल्या आचारसंहितेचे (उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पुणे महानगरपालिका  आता कठोर कारवाई करणार आहे. महापालिकेची रीतसर परवानगी न घेता शहरात राजकीय जाहिरात फलक  लावणाऱ्यांवर थेट आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त  आणि मुख्य निवडणूक अधिकारी  नवल किशोर राम यांनी दिला आहे.

परवानगी अनिवार्य, अन्यथा गुन्हा दाखल

आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कोणत्याही प्रकारचा जाहिरात फलक, बॅनर, किंवा पोस्टर लावण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

महापालिकेची परवानगी न घेता जाहिरात फलक लावल्यास, संबंधितांविरोधात त्वरित आचारसंहिता भंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला जाईल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ‘शून्य-सहनशीलता’  धोरण अवलंबले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

खर्च राजकीय पक्षाच्या खात्यात

ज्या जाहिरात फलकांवर कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव, चिन्ह किंवा उमेदवाराचा उल्लेख असेल, अशा सर्व फलकांचा संपूर्ण खर्च संबंधित राजकीय पक्षाच्या निवडणूक खर्चात  समाविष्ट केला जाईल.

निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, आता कोणत्याही पक्षाला अधिकृत परवानगीशिवाय जाहिरातबाजी करणे महागात पडणार आहे.

महापालिका आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले: “आचारसंहिता काळात नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय लावलेल्या फलकांवर तत्काळ कारवाई होईल आणि राजकीय पक्षाच्या नावाचा उल्लेख असलेल्या जाहिरात फलकांचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात गणला जाईल.”

महापालिकेने केलेल्या या घोषणेमुळे राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!