इचलकरंजी शहरातील पॅचवर्कची दयनीय अवस्था रस्त्यावर उधळलेली खडी बनली अपघातांचे कारण

इचलकरंजी शहरात सध्या सुरु असलेल्या पॅचवर्क कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर टाकलेली खडी व्यवस्थित दाबून न बसवता ती सरळ रस्त्यावर पसरलेली दिसत आहे. यामुळे दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडत असून मोटरसायकली घसरून अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
विशेष म्हणजे, रस्त्यांवरून जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीस्वाराला खडीमुळे घसरण्याचा धोका जाणवत आहे. अनेक नागरिकांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती पुढे येत असून रस्त्यावरून जाणे हा जीव मुठीत धरून करण्याचा प्रकार झाला आहे.
स्थानिक नागरिकांचे तक्रारी वाढल्या पॅचवर्कचे काम नियोजनाविना सुरू आहे खडी व्यवस्थित दाबण्यासाठी डांबर रोलरचा वापर होत नसल्याचे दिसते धूळ, खडी आणि असमतल पातळीमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे
महिलावर्ग सह शाळा,कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष त्रास
नागरिकांनी संबंधित विभागाकडे तातडीने दखल घेऊन रस्ता सुरक्षित व समतल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठे अपघात होण्याची पूर्ण शक्यता असल्याचे तक्रार केले आहे.
शहरातील रस्ते सुरळीत व सुरक्षित करणे ही नगरपालिका/महापालिकेची जबाबदारी आहे. पॅचवर्क करताना योग्य तांत्रिक पद्धतींचे पालन न केल्यास अशा घटना वारंवार घडत राहण्याची भीती नागरिक व्यक्त होत आहे































