पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात


पुणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले असून, शहर पातळीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा भाग म्हणून, काँग्रेस पक्षानेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इच्छुक उमेदवारांना अर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. काँग्रेस भवनात ९ डिसेंबर (आज) पासून अर्ज मिळण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.

“इच्छुक उमेदवारांकडून ९ ते १३ डिसेंबर या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. मात्र, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबरला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच असणार आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

बैठकांचा धडाका आणि प्राथमिक चाचपणी पूर्ण

काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या तयारीसाठी याआधीच संघटनात्मक पातळीवर अनेक बैठकांचा धडाका लावला आहे. विविध सेलच्या आणि विभागनिहाय बैठका घेऊन पक्षाने प्राथमिक स्तरावर उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे. त्यामुळे, आता आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाला उमेदवारीचे चित्र अधिक स्पष्ट करण्यास मदत होणार आहे.

महापालिकेचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुकांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया काँग्रेसने सुरू केली आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर पक्षाकडून लवकरच उमेदवारांची यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!