कोंढव्यात काँग्रेसची ‘लाट’ नाही, ‘विराट लाट’ आहे! अल कुरेश व्यापारी संघटनेचा पाठिंबा; विरोधकांचे धाबे दणाणले!


कोंढव्यात काँग्रेसची ‘लाट’ नाही, ‘विराट लाट’ आहे! अल कुरेश व्यापारी संघटनेचा पाठिंबा; विरोधकांचे धाबे दणाणले!

पुणे |  कोंढव्याच्या राजकीय आखाड्यात सध्या निवडणुकीचा धुरळा उडत नसून काँग्रेसच्या विजयाची एक ‘विराट लाट’ उसळली आहे! प्रभाग क्रमांक १९ मध्ये अल कुरेश व्यापारी संघटनेने काँग्रेसच्या चारही उमेदवारांना दिलेला जाहीर आणि एकमुखी पाठिंबा म्हणजे विरोधकांच्या सत्तेच्या स्वप्नावर फिरवलेला नांगरच म्हणावा लागेल. या एका निर्णयाने कोंढव्यातील राजकीय समीकरणे केवळ बदलली नाहीत, तर ती काँग्रेसच्या बाजूने पूर्णपणे झुकली आहेत.

पैलवाना’च्या पुण्याईची आणि माणुसकीची पोचपावती..!

हा पाठिंबा म्हणजे निव्वळ राजकीय तडजोड नाही, तर ही पै. हसन शेख यांनी आयुष्यभर केलेल्या निस्वार्थ सेवेची पोचपावती आहे. आज अत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर, “बापाने कमावलेली माणसं जेव्हा मुलाच्या पाठीशी उभी राहतात, तेव्हा जगातील कोणतीही सत्ता त्यांना रोखू शकत नाही!” अल कुरेश समाजाने आज तेच दाखवून दिले आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी, परवाने आणि संकटाच्या काळात हसन शेख नावाचा हा ‘पैलवान’ नेहमीच ढाल बनून उभा राहिला. आज त्याच ऋणाची परतफेड करण्यासाठी समाज एकवटला आहे.

डोळ्यांत अश्रू, पण आवाजात जिद्द!

कमेला बिल्डिंग येथील सभेत जेव्हा युवा नेते मोहसीन शेख बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा वातावरण स्तब्ध झाले होते. आपल्या दिवंगत वडिलांची आठवण काढताना मोहसीन शेख यांचा आवाज थरथरला, डोळे पाणावले, पण त्या अश्रूंमध्ये एक निष्ठा होती.

माझ्या वडिलांनी मला राजकारण शिकवलं नाही,

माणुसकी शिकवली… दुःख विकून सत्ता मिळवण्यापेक्षा, संघर्ष करून विश्वास जिंकणं मला मान्य आहे!” हे शब्द उच्चारताच समोर बसलेल्या जनतेच्या डोळ्यांतही पाणी आले. राजकारणात ‘संस्कार’ आणि ‘तत्व’ अजूनही जिवंत आहेत, याची प्रचिती मोहसीन शेख यांनी आपल्या कृतीतून दिली.

विरोधकांचे धाबे दणाणले!

एकीकडे सत्तेसाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना, दुसरीकडे मोहसीन शेख वडिलांच्या विचारांचा वारसा घेऊन व्यापाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. अल कुरेश व्यापारी संघटनेच्या या निर्णयामुळे विरोधकांच्या गोटात आता शांतता पसरली आहे. ज्यांच्याकडे जनशक्ती आहे आणि ज्यांच्या मागे हसन शेखांसारख्या लोकनेत्याचा आशीर्वाद आहे, त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कोंढव्याच्या मातीने आपला कौल दिला आहे— आता फक्त विजयाची मोहोर उमटणे बाकी आहे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!