गर्जला पँथर, हादरली सत्ता! शोषितांच्या मुक्तीचा नवा रणसंग्राम !!


गर्जला पँथर, हादरली सत्ता! शोषितांच्या मुक्तीचा नवा रणसंग्राम!!

संतोष आठवले यांच्या नेतृत्वाखाली ‘पँथर आर्मी’चा विजयी त्रैवार्षिक प्रवास ; अन्यायाच्या छाताडावर उभा राहिला समतेचा जागर!

महाराष्ट्राच्या मातीत वाघाच्या काळजाची माणसं जन्माला येतात आणि अन्यायाची तटबंदी फोडून काढतात, याचा प्रत्यय गेल्या तीन वर्षांत कुणी दिला असेल, तर तो ‘पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने’! ज्यांच्या रक्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष आहे आणि काळजात छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे, अशा जिगरबाज कार्यकर्त्यांनी प्रस्थापित सत्ताकेंद्रांना घाम फोडला आहे. संस्थापक अध्यक्ष संतोष एस. आठवले नावाचा हा सामाजिक झंझावात आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून, कर्नाटकच्या सीमेपर्यंत शोषितांचा बुलंद आवाज बनला आहे!

जमीन कुणाच्या बापाची.? कसणाऱ्याच्या हक्काची.!

अहो, नुसत्या गप्पा मारणारे अनेक पाहिले, पण ‘भूमीहीन शेतमजूर हा शेतमालक झालाच पाहिजे’ ही भीमगर्जना प्रत्यक्षात उतरवणारी ही सेना आहे. आझाद मैदानात जो ‘भूमीहीन सत्याग्रह’ झाला, त्याने मंत्रालयातील खुर्च्यांनाही हादरे बसले. सरकारला सांगणं आहे, जमिनींचे तुकडे पाडून आपल्या बगलबच्चांना वाटण्यापेक्षा, ज्यांच्या घामातून हा देश उभा राहिला, त्या भूमिहीनांना जमिनीचा हक्क द्या! पँथर आर्मीने याच मागणीसाठी शंख फुंकला आणि प्रशासकीय यंत्रणेला गुडघ्यावर टेकवले.

निधीचा हिशोब द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा..!

निधी पळवणाऱ्या चाणक्यांचे कान आठवलेंनी घट्ट धरले आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेला निधी इतर कामांकडे वळवणाऱ्यांना या संघटनेने तांत्रिक गणितासह जाब विचारला आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही विशेष कायदा करा, अशी मागणी करून या संघटनेने केवळ रडगाणे न गाता अभ्यासू लढा उभा केला आहे.

प्रगतीचा लेखाजोखा : एका नजरेत | महत्त्वाचे टप्पे | साध्य केलेले ध्येय |

| विस्तार | महाराष्ट्र ते कर्नाटक (पालघर ते बेळगावपर्यंत जाळे) | | पुरस्कार | आदर्श रमाई, शिव प्रेरणा व समतावादी भारत गौरव पुरस्कार | | कामगार कल्याण | हजारो बांधकामकरांना सुरक्षा संच आणि साहित्याचे वाटप | | राजकीय झेप | विकासाच्या मुद्द्यावर हातकणंगलेत महायुतीला पाठिंबा |

आता थांबणे नाही..! ‘गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ ही संकल्पना घेऊन निघालेली ही पँथर आर्मी आता थांबणार नाही. उमेश जामसंडेकर, डॉ. राजेंद्र सिंह वालिया, अमोल कुरणे आणि ज्योती झरेकर यांसारख्या शिलेदारांच्या साथीनं संतोष आठवले यांनी परिवर्तनाची जी मशाल पेटवली आहे, ती आता महाराष्ट्राचा सामाजिक नकाशा बदलल्याशिवाय राहणार नाही!

जय भीम! जय शिवराय!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!