शौर्य, न्याय आणि जनसेवेचा तेजोमय दीपस्तंभ! राजमाता अहिल्यादेवींना सांगलीत मानाची आदरंजली !


शौर्य, न्याय आणि जनसेवेचा तेजोमय दीपस्तंभ! राजमाता अहिल्यादेवींना सांगलीत मानाची आदरंजली !

सांगली प्रतिनिधी : अशोक मासाळ

इतिहासाच्या पानांवर रक्ताचे सडे शिंपडणारे राजे अनेक झाले असतील, पण प्रजेच्या डोळ्यांतील आसवे पुसून तेथे समाधानाचा दिवा लावणारी एखादीच ‘राजमाता’ होते! न्याय, धर्म, दानशूरता आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा एक अजोड आणि अलौकिक आदर्श या भूतलावर निर्माण करणाऱ्या महान राज्यकर्त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सांगलीत प्रचंड उत्साहात आणि भक्तीच्या रसाळ वातावरणात साजरी झाली. सांगली येथील अहिल्यादेवी स्मारकात जमलेल्या जनसमुदायाने आणि मान्यवरांनी या माऊलीच्या चरणी आपले मस्तक झुकवून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना सांगलीतील नामवंत नगरसेवक मा. विष्णू माने, पत्रकार अशोक मासाळ, अरविंद गावडे, शरद पाटील, सुधीरकुमार ओलेकर, निवास कोळेकर, आशिष यमगर, दिलीप वाघमोडे, संजय दुधाळ, पडळकर सर, सुरेश नरोटे, बंडगर सर, गडदे, आणि संजय युवराज पाटील यांसह अनेक क्षेत्रांतील दिग्गज आणि देशभक्त नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या गगनचुंबी कार्याचा गौरव करताना उपस्थितांचे कंठ दाटून आले होते. आजच्या स्वार्थी, लाचखोर आणि नातेवाईकधार्जिण्या राजकारणाच्या युगात अहिल्यादेवींची न्यायनिष्ठा म्हणजे डोळ्यात अंजन घालणारे अंजनच आहे. न्यायदानाच्या तराजूत त्यांनी कधीही नातेसंबंधांचे वजन पडू दिले नाही, की पदाच्या आणि संपत्तीच्या मोहाने त्यांचा हात थरथरला नाही. प्रजेचा शेवटचा माणूस आणि राजवाड्यातील अधिकारी यांच्यात फरक न करता प्रत्येकाला समान न्याय देणारी अशी राज्यकर्ती होणे केवळ अशक्यच! म्हणूनच त्यांच्या राज्यातील जनतेचा न्यायव्यवस्थेवर देवासारखा विश्वास निर्माण झाला होता.

अहिल्यादेवींनी कधीही सत्ता उपभोगली नाही, तर सत्तेला जनतेची दासी बनवले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत त्यांनी बांधलेले घाट, विहिरी, धर्मशाळा आणि मंदिरांचे विस्तीर्ण जाळे पाहिले की थक्क व्हायला होते. ही केवळ दगडधोंड्यांची बांधकामे नव्हती, तर अठरापगड जातीच्या प्रजेला सुख सोयी देणारा तो माऊलीचा पदर होता. देशातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट करणारी ही वीरांगना जेव्हा हातात तलवार घेऊन शत्रूला अंगावर घ्यायची, तेव्हा मराठेशाहीच्या पराक्रमालाही नवा बहर यायचा.

आज चहूबाजूंनी माजलेली सामाजिक विषमता, बोकाळलेला अन्याय आणि खुर्चीसाठी चाललेले लाचार राजकारण पाहिले की, अहिल्यादेवींची आठवण आल्याशिवाय राहत नाही. प्रशासन कसे असावे आणि नैतिक मूल्यांची जपणूक कशी करावी, याचा धडा गिरवायचा असेल तर अहिल्यादेवींचे जीवन हाच एकमेव आदर्श ग्रंथ आहे. आजची ही जयंती म्हणजे केवळ कोरडे स्मरण नव्हे, तर समाजाला गढूळतेतून बाहेर काढून योग्य दिशा देणाऱ्या विचारांचे जिवंत पुनर्स्मरण आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सांगलीकरांनी राजमाता अहिल्यादेवींचा हा दैदिप्यमान विचारांचा वारसा पुढच्या पिढीच्या रक्तामध्ये रुजविण्याचा आणि न्याय, सेवा व लोककल्याणासाठी झटण्याचा पवित्र संकल्प सोडला. अहिल्यादेवींचे जीवन म्हणजे आजही अंधारात चाचपडणाऱ्या समाजासाठी एक प्रेरणादायी आणि तेजोमय दीपस्तंभ आहे, याच भावनेने सांगलीकरांनी आपल्या या लाडक्या माऊलीला अश्रूभैरी आणि भावपूर्ण आदरांजली वाहिली.

 

 

 


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!