डायलॉग किंग’ राजकुमार यांची आठवण करून देणाऱ्या मांगुरे सरांच्या खणखणीत संवादांनी पश्चिम महाराष्ट्र हादरणार !

पुणे: महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात व्यसनाचा जो विळखा बसला आहे, त्या विदारक वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘विखारातून विजयाकडे’ या लघुपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. एम. एस. प्रोडक्शन निर्मित या महत्त्वाकांक्षी लघुपटाचे अधिकृत चित्रीकरण पुढील महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध लोकेशन्सवर सुरू होणार आहे.
राजकुमार यांची आठवण करून देणारी ‘संवादफेक’!
या लघुपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेते महमदरफिक मांगुरे सर! चित्रपटसृष्टीचे ‘डायलॉग किंग’ राजकुमार यांची आठवण करून देणारा पहाडी आवाज आणि तितकीच करारी संवादफेक ही मांगुरे सरांची खासियत ठरत आहे. जेव्हा ते पडद्यावर आपल्या खास शैलीत नशेत बुडणाऱ्या तरुणांना ललकारतात, तेव्हा तो अनुभव अंगावर काटा आणणारा असतो. त्यांचे संवाद म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे ‘बाण’ आहेत.
लघुपटातील काही जबरदस्त डायलॉग्स :
“जानी… नशा तो वो करते है जिनके इरादे कमजोर होते है, असली मर्द तो अपनो की हिफाजत मे अपनी जान झोक देते है!”
“मर्दानगी नशा करण्यात नसते, तर उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला सावरण्यात असते. लक्षात ठेव, बाटलीत बुडणारा माणूस स्वतःच्या घराची राखरांगोळी करतो!”
पश्चिम महाराष्ट्राच्या मातीत चित्रीकरण
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात या लघुपटाचे महत्त्वाचे प्रसंग चित्रित केले जाणार आहेत. येथील अस्सल माती आणि मांगुरे सरांचे दमदार संवाद यांमुळे हा लघुपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचणार आहे.
लेखणी सम्राट मेहबूब सर्जेखान यांचे सामाजिक मिशन
निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथाकार मेहबूब सर्जेखान यांनी हा लघुपट केवळ करमणुकीसाठी नाही, तर एका सामाजिक क्रांतीच्या उद्देशाने तयार केला आहे. एका व्यसनी मुलामुळे घराची कशी राखरांगोळी होते आणि त्यातून पुन्हा ‘विजयाचा गुलाल’ कसा उधळायचा, याचा वस्तुपाठच त्यांनी आपल्या लेखणीतून मांडला आहे.
लघुपटाची ठळक वैशिष्ट्ये:
सादरीकरण: एम. एस. प्रोडक्शन
मुख्य भूमिका: अभिनेते महमदरफिक मांगुरे (डायलॉग किंग राजकुमार शैलीत )
विशेष पाहुणे कलाकार: प्रसिद्ध समाजसेवक गजानन शिरगावे
दिग्दर्शन: मेहबूब सर्जेखान सर..
चित्रीकरण स्थळ : पश्चिम महाराष्ट्र (पुढील महिन्यापासून सुरू)
ठळक संदेश : “व्यसन सोडा, कुटुंब जोडा!”
आज वेळ आली आहे, आपल्या घरातील आणि समाजातील ‘आकाश’ला सावरण्याची. ‘विखारातून विजयाकडे’ ही केवळ फिल्म नाही, तर ती एका नव्या समाजपरिवर्तनाची धगधगती मशाल आहे!























