ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी हे राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कारने सन्मानित. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.


देहुरोड शहरात आनंदाचं वातावरण पिंपरी चिंचवड परिसर व संपुर्ण महाराष्ट्रातुन एम डी चौधरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी 

देहूरोड दि. :- देहूरोड शहराच्या शीर पेचात मानाचा तुरा १० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन( नवीन) येथे देशातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा विविध पुरस्कार देवून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तसेच देहुरोड शहराच्या शीर पेचात मानाचा तुरा ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन च्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवुन लोकांना आपले संघटनेच्या मार्फत न्याय मिळवून देणारे ह्यूमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांचे मानव अधिकारी मधील सामाजिक कामाची दखल घेऊन त्यांना १० डिसेंबर राष्ट्रीय मानव अधिकार दिवस रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन (नवीन) येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय मानव रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मान भेटल्याने ह्युमन राईट्स फाॅर प्राॅटेक्शन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांन मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे संपुर्ण महाराष्ट्रातुन त्यांचे सर्व परिचित लोकांच्या वतीने त्यांचावर अभिनंदनाचा वर्षाव करीत आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!