पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाकडून करोडो रुपयांचा अपहार


पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाकडून करोडो रुपयांचा अपहार…

पोलीस पाटीलांचा मानधनाची रक्कम लाटली…

प्रेस मीडिया लाईव्ह

 सुनील पाटील

‎रायगड जिल्ह्यात पोलीस पाटील यांच्या मानधनात अपहार करून पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे.या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‎रायगड जिल्ह्यात पोलीस पाटील यांच्या मानधनात अपहार करून पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे

‎रायगड जिल्ह्यात पोलीस पाटील यांच्या मानधनात अपहार करून पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा आणि एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागात वेतन फरकाच्या रकम दाखवून साडेचार कोटीहून अधिक रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची बाब समोर आली होती.

‎या प्रकरणी तीन कर्मचाऱअयांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतांनाच आता पोलीस अधीक्षक कार्यालायत याच्याशी मिळता जुळता प्रकार समोर आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका कनिष्ठ लिपीकाने, चक्क पोलीस पाटील यांच्या मानधनाची नावाखाली १ कोटी ७८ लाख २९ हजार ३०० रक्कम लाटल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी संबधित लिपीका विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‎हा कनिष्ठ लिपीक पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेत कर्यरत होता. त्याच्याकडे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांचे मानधन काढण्याचे काम होते. याचाच गैरफायदा घेत त्याने हा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस पाटील यांचे मासिक मानधनाची रक्कम कोषागार कार्यालयातून मान्यता घेऊन नंतर नंतर ती संबधित पोलीस पाटलांना देणे अपेक्षित होते. पण कर्तव्यात कसूर करत त्याने प्रत्यक्ष कामावर हजर नसलेल्या पोलीस पाटील यांच्या बनावट नावे मानधनाची रक्कम काढून ती रक्कम हा कनिष्ठ लिपीक स्वतःच्या आणि इतर व्यक्तिंच्या नावावर जमा करत असे. महत्वाची बाब म्हणजे थेट खात्यावर ही रक्कम केली जात असे. महत्वाची बाब म्हणजे अपहाराची मोठी रक्कम त्याने स्वतःच्या पत्नीच्या खात्यात जमा केल्याची बाब उघड झाली आहे.

‎या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ३११८ (४), ३३६(३), ३३७.३३८.३३९. ३४४ कलमांतर्गत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान पोलीस विभागात पोलीस पाटील यांच्या मानधनाचा करोडो रुपयांचा अपहार सुरु असतांना याची भनक संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांन कशी नाही लागली याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली जात आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!