कोंढव्याच्या ‘संडे बाजारात’ मोहसीन शेख यांची डरकाळी , विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या ‘नशे’वर काँग्रेसचा हातोडा!


कोंढव्याच्या ‘संडे बाजारात’ मोहसीन शेख यांची डरकाळी ,  विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या ‘नशे’वर काँग्रेसचा हातोडा!

पुणे |  पुण्याचा कोंढवा भाग तसा नेहमीच गजबजलेला, पण कालच्या रविवारी या भागात केवळ ‘संडे बाजार’ भरला नव्हता, तर परिवर्तनाचा एक नवा ‘बाजार’ मांडला गेला होता! प्रभाग क्रमांक १९ च्या कौसरबाग परिसरात काँग्रेसचे युवा नेते मोहसीन शेख यांची तोफ अशी काही धडाडली की, विरोधकांच्या तंबूत आतापासूनच थंडी भरली असेल, यात शंका नाही.

“राजकारण ही काय तुमची खासगी जहागीर आहे?” असा खडा सवाल विचारत मोहसीन शेख यांनी जेव्हा व्यासपीठावर पाय ठेवला, तेव्हा तरुणांच्या घोषणांनी आभाळ दुमदुमून गेले. त्यांच्या भाषणात केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तर कोंढव्याच्या जखमेवर फुंकर घालण्याची जिद्द होती.

‘नशामुक्ती’चा महाममंत्र आणि विकासाचा पंचप्राण

कोंढव्याच्या गल्लीबोळात पसरलेली नशेची वाळवी उपटून फेकण्याचा निर्धार शेख यांनी व्यक्त केला, तेव्हा माता-भगिनींच्या डोळ्यात एक आशेचा किरण दिसला. रस्ते, पाणी आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या या प्रभागाला आता ‘काँग्रेसचा हात’च बाहेर काढू शकतो, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

“सत्ता येते आणि जाते, पण दिलेला शब्द आणि केलेली सेवा हीच जनतेच्या काळजात घर करते,” या अत्रेछाप वाक्याने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

युवाशक्तीचा जागर!

सभेला जमलेली ती तरुणांची अलोट गर्दी पाहून असं वाटत होतं की, कोंढव्याचा तरुण आता केवळ मतं देण्यासाठी नाही, तर हिशोब मागण्यासाठी सज्ज झाला आहे. “विकास, विश्वास आणि पारदर्शकता” या त्रिसुत्रीचा नारा देत मोहसीन शेख यांनी एक प्रकारे विरोधकांच्या भ्रष्टाचाराचा ‘संडे बाजार’च उठवला!

आता या सभेनंतर कोंढव्याच्या राजकारणात नवे ‘पर्व’ सुरू होणार की जुनेच ‘ढिगाणे’ राहणार, याचे उत्तर काळच देईल. पण मोहसीन शेख यांच्या या झंझावाताने निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसचा घोडा आता चौखूर उधळणार, हे मात्र निश्चित!

 

 


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!