सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश नाईक यांनी घेतले  सुप्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशुद्दीन  मिरासाहेब दर्ग्याचे दर्शन


सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजेश नाईक यांनी घेतले  सुप्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशुद्दीन  मिरासाहेब दर्ग्याचे दर्शन

सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. राजेश नाईक यांनी आज मिरज येथील दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध हजरत ख्वाजा शमशुद्दीन मीरासाहेब दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दर्गा शरीफवर चादर अर्पण करून आगामी वाटचालीस यश मिळावे, यासाठी साकडे घातले.

राजेश नाईक यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सांगली आणि मिरज परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रथम धार्मिक स्थळांना भेटी देऊन आशीर्वाद घेण्यावर भर दिला आहे. मीरासाहेब दर्ग्यात पोहोचल्यानंतर दर्ग्याचे खादिम व विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, “सांगली शहर आणि जिल्ह्याला काँग्रेसचा मोठा वारसा आहे. सर्वधर्मसमभावाच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष असून, सामाजिक सलोखा कायम राखत सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे हेच माझे मुख्य ध्येय आहे.”

याप्रसंगी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाईक यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्गा परिसरातील नागरिकांनीही त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

एकजुटीने काम करण्याचा निर्धार

“पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सांगली शहरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमाने उभा करण्यासाठी जुन्या-जाणत्या नेत्यांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांचा संगम साधून आम्ही एकजुटीने काम करू.” — राजेश नाईक (अध्यक्ष, सांगली शहर जिल्हा काँग्रेस)

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!