विशेष मुलांच्या क्षमतांचा गौरव–प्रमोद खाडे (पीएसआय) यांची प्रमुख उपस्थिती.


सांगली जिल्हा प्रतिनिधी : अशोक मासाळ
प्रभात मंदिर मतिमंद शाळेत जागतिक मतिमंद दिन विविध उपक्रमांनी आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील विशेष मुलांविषयी सहानुभूती समज आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो यंदाही शाळेने विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आणि आनंददायी उपक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा प्रमोद खाडे पीएसआय सांगली शहर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जितावस्था लाभली त्यांच्या हस्ते धैर्य चिकाटी आणि अंधाऱ्या जगात प्रकाश आणणाऱ्या कर्तुत्वान व्यक्तिमत्व हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी त्यांनी हेलन केलर यांचे जगभरातील योगदान सांगत विशेष मुलांच्या मध्ये अद्भुत क्षमता असते. योग्य मार्गदर्शन व प्रेम मिळाले तर हीच मुले समाजात आपलं स्थान निर्माण करू शकतील असे ते बोलले.
यानंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद अधिक खुलवण्यासाठी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते खाऊ वाटप करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला.
यावेळी शाळेचे शिक्षिका वैशाली कोपर्डे शिक्षक अरुण जाधव व सुनील जाधव उपस्थित होते.































