अनेक दानशूर व्यक्तीचा या विवाह सोहळ्याला मदतीचा हात.
प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे
देहूरोड दि.:- सुविख्यात माई बाल भवन येथील अनाथ व अंध अशा दोन कन्यांचा विवाह सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोठ्या उत्साहात पार पडला. समाजाचे आपण ही काही देणे असते यांची जाणीव ठेवत या विवाह सोहळ्यात दानशूर व्यक्तींनी या विवाह सोहळ्याला मदतीचा हात दिला.

बापदेव महाराज लाॅस येथे हा विवाहसोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला या विवाह सोहळ्यात ची. सौ. का. रूपाली सुहास गिरगोसावी हिचा विवाह शरद अरुण ठाकरे यांच्याशी,तर ची. सौ. का. साक्षी पवन परिहार हिचा विवाह शेखर विक्रम नाईक यांच्याशी मंगल वातावरणात हे मंगलपरिणय विवाह पार पडला. दोन्ही विवाह विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला.
या विवाहासाठी बापदेव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब तरस यांनी विवाहासाठी एक रूपया न घेता संपूर्ण हॉल मोफत उपलब्ध करून दिला. तर पप्पू उर्फ रोहिदास दांगट यांनी संपूर्ण आलेल्या मान्यवरांचे जेवणाचा संपूर्ण खर्च रोहीदास दांगट यांनी उचलला त्याच बरोबर वई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने रोख स्वरूपात मदत म्हणून फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी हातभार लावला तर संकल्प सोशल फाउंडेशनच्या चे संस्थापक अध्यक्ष बापू साहेब कातळे व नवनिर्वाचित नगरसेविका रेश्मा कातळे यांनी या दोन्ही मुलींना दोन टीव्ही संच दिले.तर विलास बबन जामदार व सचिन जामदार व त्यांचे सहकारी महिला मनसेचे महिला शहर अध्यक्षा अनिता मंगवाणी यांनी दोन्ही मुलीना संसार उपयोगी सर्व भांडे कुंडीचा हातभार लावले वरील जामदार हे नुकतेच त्यांच्या मुलाचे वाढदिवस साजरा करण्यासाठी माई बाल भवनला गेले असता त्यांना कळाले की दोन मुलींचे विवाह ठरलें आहे तेव्हा त्यांनी या लग्नात संसार उपयोगी भाडे कुंडी दिले हा विवाह सर्वांच्या उपस्थितीत अतिशय उत्साह पार पडला . आता पर्यंत माई बाल भवनच्या वतीने ३८ मुलींचे विवाह संपन्न झाले आहे आता या दोन विवाह मुळे यांची संख्या आता ४० झाली आहे असे संस्थापक मधुकर इंगळे यांनी द प्रेस मीडीया लाईव्ह च्या प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली तसेच आज कै प्रतिज्ञा देशपांडे (इंगळे) यांनी जे स्वप्न पाहीले होते ते पूर्ण करण्याचा आम्ही करत आहे आज जर कै प्रतिज्ञा देशपांडे इंगळे जर असते तर गोष्टी वेगळी असते तरी आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद होत आहे आज परत दोन्ही मुलींचे विवाह सोहळा थाटामाटात होत आहे असे सांगताना संस्थेचे संस्थापक मधुकर इंगळे हे भावुक झाले होते. आज समाजाचे काही देणे असते यांची जाणीव ठेवून सर्व दानशुराच्या सहकार्यामुळे संस्थेवरील आर्थिक भार कमी होऊन विवाह सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाले व पार पडला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील अनेक दाते, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मदतीचा हात पुढे केला माई बाल भवन यांचे सदा ऋणी राहील असे ही भावना व्यक्त केल्या यात विवाह सोहळयाला मंगेश भोसले, शुभम काटे, अमोल गायकवाड, श्याम सर, स्वप्नील इंगळे, श्रीकांत आदींनी विशेष सहकार्य केले.
या विवाह सोहळ्याचा कार्यक्रमाच्या शेवटी माई बाल भवनच्या रुचिरा इंगळे यांनी सर्व दाते, सहकार्याचे आणि उपस्थितांचे मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजात असे दानशूर दाते सामाजिक बांधिलकी जपणारे दात्यांचे सहकार्य करणारे हात असल्यामुळे सामाजिक कार्याला अधिक बळ मिळते, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी उपस्थित सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक मान्यवरांचे तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचे माई बाल भवन संस्थेकडून सत्कार करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल माई बाल भवन संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्यात संविधान सन्मान संघचे चंद्रशेखर पात्रे,(पत्रकार ) बाबु हिरमेठकर, विजय पवार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब काळे, सुगप्पा कोळी तर पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्रमांक १६ चे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश तरस ऐश्वर्या तरस रोहीदास तरस दत्तात्रय तरस अशोक राऊत नवनाथ संदीप थोरात पाटील विनायक राऊत मोहन राऊत धनंजय राऊत संदीप राऊत धनंजय मोरे विनायक राऊत योगेश दिसलें आदि मान्यवर उपस्थित होते.































