पुण्यात स्वीकृत नगरसेवक पद तृतीय पंथीयांना द्या सावली सोशल फाउंडेशनची मागणी. 


नागरी विमान वाहतूक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना ही दिले निवेदन . 

पुणे शहरातील तज्ज्ञ आणि वंचित घटकाला महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून तृतीयपंथी नागरिकांची नियुक्ती करावी अशी मागणी सावली सोशल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष आम्रपाली दशरथ मोहीते यांनी महापालिका निवडणुकी आयुक्त नवलकिशोर राम व खासदार व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर अभ्यासक यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद आहे त्यानुसार विविध महानगरपालिके मध्ये डॉक्टर वकील अभियंता प्राध्यापक तसेच सामाजिक क्षेत्रातील अनुभव असलेल्या व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी दिली जाते, मात्र तृतीयपंथी समाज हा आज ही मुख्य प्रवाह पासून वंचित असुन स्वीकृत नगरसेवक पदासाठी तृतीयपंथीय यांची आज पर्यंत निवड झालेली नाही .

शासनाच्या नव्या नगरविकास खात्याच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्वीकृत सदस्य निवड करताना संबंधित व्यक्ती चा राजकीय पक्षांशी थेट संबंध नसावा अशी अट आहे या अटी मुळे यापूर्वी तृतीयपंथीयांना संधी देता येऊ शकते. सावली सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे निवेदना मध्ये स्वीकृत नगरसेवक पदावर तृतीयपंथीय यांची निवड करावी करावी अशा मागणी करण्यात आली आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!