व्यसनाच्या नरकातून व्यवसायाच्या शिखराकडे..! अहो तरुणांनो, हातातील ‘ग्लास’ फेका आणि ‘प्रेस मीडिया’चा झेंडा हाती धरा. !


व्यसनाच्या नरकातून व्यवसायाच्या शिखराकडे..! अहो तरुणांनो, हातातील ‘ग्लास’ फेका आणि ‘प्रेस मीडिया’चा झेंडा हाती धरा. !

बेरोजगारीच्या जखमेवर उद्योजकतेचे मलम; अनिस जमादारांचे महाराष्ट्रव्यापी ‘व्यसनमुक्त भारत अभियान’!

आजचा तरुण काय करतोय? डिग्रीचे कागद हातात घेऊन नोकरीच्या वणवण पाचवीला पूजलेल्या भटकंतीत थकला की, तो गुत्त्यावर जाऊन विसावतोय! छे, छे, छे… काय ही महाराष्ट्राची दुरवस्था? ज्या हातांनी उद्याचा इतिहास लिहायचा, ते हात आज ‘पॅग’ आणि ‘चिलमी’च्या धुराड्यात अडकले आहेत. बेरोजगारीचे दुःख मोठेच आहे, पण त्या दुःखाला दारूच्या पेल्यात बुडवणे हा काही त्यावरचा उपाय नव्हे!

पण थांबा..! याच घोर अंधारात आता आशेचा एक किरण चमकला आहे. ‘व्यसनमुक्त भारत अभियान’ आणि ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ यांनी मिळून एका अशा मोहिमेचा शंख फुंकला आहे, जो तरुणांना व्यसनाच्या खाईतून बाहेर काढून थेट व्यवसायाच्या रणांगणात उतरवणार आहे!

व्यसन नव्हे, व्यवसाय करा..!

अहो, नुसते ‘व्यसन सोडा’ असे पोपटपंची सल्ले देऊन हा देश सुधारणार नाही. तरुणाला कामाची भूक आहे, आणि हीच भूक आता ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ भागवणार आहे. गावोगावी आता फक्त चावडीवर गप्पा रंगणार नाहीत, तर तिथे ‘व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र’ उभी राहणार आहेत. तिथे तरुणाला केवळ उपदेश मिळणार नाही, तर ‘व्यवसाय कसा करायचा’ याचे बाळकडू दिले जाईल.

मराठी तरुण आणि उद्योजकता मराठी तरुण उद्योजक होत नाही, असा एक लांछनास्पद शिक्का आपल्या कपाळावर मारला गेलाय. पण आता हा शिक्का पुसून काढण्याची वेळ आली आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’च्या माध्यमातून बेरोजगारीचा हा भस्मासुर गाडण्यासाठी तरुणांना व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ही संधी म्हणजे केवळ नोकरी नाही, तर स्वतःचा स्वाभिमान जागा करण्याचा मार्ग आहे!

अनिस जमादारांचा ‘एल्गार’!

या संपूर्ण मोहिमेचे सारथ्य करणारे ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे प्रसिद्धी प्रमुख श्री. अनिस जमादार पोटतिडकीने सांगत आहेत की, “तरुणांनो, व्यसनाच्या वाटेने गेलात तर घर उद्ध्वस्त होईल आणि व्यवसायाच्या वाटेने आलात तर देश सुधारेल!” त्यांच्या या आवाहनाला आता गावोगावातून प्रचंड प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे.

सावधान! आता उशीर करून चालणार नाही… जर तुम्हाला किंवा तुमच्या गावातील तरुणांना या नरकयातनेतून बाहेर पडून मानाने जगायचे असेल, तर तातडीने खालील क्रमांकावर संपर्क साधा. चला, व्यसनाचा त्याग करूया आणि उद्योजकतेचा नवा महाराष्ट्र घडवूया!

संपर्क: श्री. अनिस जमादार

(प्रसिद्धी प्रमुख, प्रेस मीडिया लाईव्ह) > भ्रमणध्वनी: ७७९८१०९६१२

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!