६९ व्वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध पक्ष सामाजिक संघटना च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.


परमपूज्य महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने देहूरोड शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले ऐतिहासिक बुद्ध विहार येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिस्तुपास पोलीस आयुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी प्रवक्ते डॉ. कीर्ती पाल गायकवाड, साहित्यिक मिलिंद तायडे, दीपक भालेराव खांडेकर यांनी अभिवादन करून मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षाचे आजी-माजी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. ऐतिहासिक बुद्ध विहार येथे सकाळ पासून गौतम बुद्ध चरणी नतमस्तक होऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तुपास अभिवादन करण्यासाठी विविध परिसरातील लोकांनी अभिवादन करून दर्शन घेतले ऐतिहासिक बुद्ध विहार समितीचे अष्टप्रधान मंडळाचे अशोकराव गायकवाड, मीना गायकवाड, बापू गायकवाड, अरुण जगताप, रंजना सोनवणे, नितीन कांबळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जनरल हॉस्पिटल येथे संविधान सन्मान संघच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास डॉ रामदास ताटे व बाबु हिरमेठकर यांनी धुपदीप प्रज्वलित केले तर संविधान सन्मान संघ चे जेष्ठ मार्गदर्शक संजय आगळे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी डॉ रामदास ताटे, मोझेस दास, संजय आगळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संविधान सन्मान संघ चे मोझेस दास संजय आगळे बाबु हिरमेठकर, विजय पवार, कृष्णा गायकवाड, शंकर दोडमणी, राहुल गायकवाड, महेश गायकवाड, संजय शेंडे आदि उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) च्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऐतिहासिक सुभाष चंद्र बोस चौक येथे अभिवादन करण्यात आले डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आवारातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्या सर्व पक्ष संघटनेच्या वतीने पुष्प माला अर्पण करून वंदन करण्यात आले ऐतिहासिक सुभाष चौकात कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन देहूरोड शहर अध्यक्ष अरविंद गायकवाड कॅन्टोन्मेंट बोर्डचे मनोनित सदस्य अँड कैलास पानसरे बाळासाहेब धावरे यांनी अभिवादन केले याप्रसंगी प्रशासक कैलास पानसरे, बाबूदूध घागरे, बाळासाहेब धावरे यांनी आपले विचार मांडले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सुरेश गायकवाड अशोक चव्हाण गौतम कांबळे प्रकाश डावरे शशिकांत सप्पागुरु महेश गायकवाड, चंद्रकांत अनागोंदी उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल येथे मुस्लिम विकास विचार मंचच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी मुस्लिम विकास विचार मंचचे अध्यक्ष रजाक शेख व अनवर अली शेख यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी विचार म्हणजे अध्यक्ष रजाक शेख यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी हुसेन शेख, गौस सुनार, अन्वर शेख (शिंपी), सचिन जोगदंड, नितीन सोनवणे, फारुक शहा, जाकीर सय्यद, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विश्वरत्न प्रज्ञा सुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा पुरुष व महिला कार्यकारणी समता सैनिक दल धम्मभूमी सामाजिक संस्था, वंचित बहुजन आघाडी, बुद्ध विहार ट्रस्ट व देहूरोड येथील विविध संघटनेच्या वतीने कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पा कांबळे, आशा गायकवाड, संजीवनी चव्हाण, शिल्पा शेंडे यांनी दिलीप प्रज्वलित केले तर के एच सूर्यवंशी ॶॅड अशोक रूपवते परशुराम मोहन, विशाल चव्हाण यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी देहूरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पीएसआय लखन कुमार वाव्हळे ,सुनील कांबळे, सुरेश भालेराव, करीम शेख, दादू गायकवाड कुलदीप शिंदे, यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.































