नशेत झिंगणाऱ्या पिढीला सावरण्यासाठी मेहबूब सर्जेखांचा ‘विजयाचा’ प्रहार ; ‘विखारातून विजयाकडे’ लघुपटाचा हुंकार..!


नशेत झिंगणाऱ्या पिढीला सावरण्यासाठी मेहबूब सर्जेखांचा ‘विजयाचा’ प्रहार ; ‘विखारातून विजयाकडे’ लघुपटाचा हुंकार..!

पुणे :  आजची तरुण पिढी नशेत गुंग होऊन विनाशाच्या गर्तेत कोसळत असताना, त्यांना बाहेर काढण्यासाठी ‘वर्ल्ड रेकॉर्डेड प्रेस मीडिया लाईव्ह’चे मुख्य संपादक महबूब गुलाब सर्जेखान यांनी आता समाजप्रबोधनाचा ‘कॅमेरा’ खांद्यावर घेतला आहे! ‘नशा मुक्त भारत’ करण्यासाठी केवळ लेखणी चालवून भागणार नाही, हे ओळखून सर्जेखांनी ‘विखारातून विजयाकडे’ या लघुपटाच्या माध्यमातून एक मोठे सामाजिक पाऊल उचलले आहे. व्यसनाधीनतेचे भीषण वास्तव मांडणारा हा लघुपट पूर्ण एक तासाचा असणार आहे.

आझम कॅम्पसचा पुढाकार आणि तरुणांना आवाहन:

पुण्यातील शैक्षणिक क्षेत्राचे केंद्र असलेल्या आझम कॅम्पसच्या वतीने नुकतीच नशामुक्तीसाठी एक मोठी मोहीम राबवण्यात आली होती. “आजच्या तरुणांनी नशेपासून दूर राहावे,” असे कळकळीचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले होते. आझम कॅम्पसने दिलेला हा संदेश आणि सामाजिक भान अत्यंत महत्त्वाचे असून, अशा उपक्रमांमुळेच तरुण पिढीला दिशा मिळणार आहे.

या पवित्र कार्यासाठी आझम कॅम्पस संचलित डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीशी सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, या उपक्रमाचे प्रायोजकत्व त्यांनी स्वीकारावे, अशी आमचीचौ नाही  पुणेकरांची इच्छा आहे. अशा दिग्गज संस्थेचे पाठबळ लाभल्यास व्यसनांविरुद्धच्या या लढ्याला नक्कीच जागतिक ताकद मिळेल.
॥ बातमीदारीनंतर आता निर्मितीचे मैदान! ॥
आतापर्यंत ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ने केवळ खमंग आणि रोकठोक बातमीदारीने सत्ताधाऱ्यांना घाम फोडला; पण आता आमचा प्रवास केवळ बातम्यांपुरता मर्यादित राहणार नाही! एम. एस. प्रॉडक्शन (M.S. Production) अंतर्गत सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही आता ‘लाईट, कॅमेरा आणि ॲक्शन’च्या क्षेत्रात उतरलो आहोत. समाजातील जळजळीत प्रश्न मांडण्यासाठी चित्रपट निर्मिती हे आमचे नवे माध्यम असेल!
पश्चिम महाराष्ट्रात रंगणार चित्रीकरणाचा थरार..!

पुढील महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील विविध लोकेशन्सवर या लघुपटाचे चित्रीकरण धडाक्यात सुरू होणार आहे. यात मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेते महामद्रफीक मांगुरे दिसणार असून, स्वतः महबूब सर्जेखान यांनी या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

नशेत झिंगणाऱ्या पिढीला सावरण्यासाठी आणि भारत ‘व्यसनमुक्त’ करण्यासाठी सुरू झालेला हा चित्रपट-प्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एम. एस. प्रॉडक्शन प्रस्तुत

वर्ल्ड रेकॉर्डेड प्रेस मीडिया लाईव्ह

मुख्य संपादक: महेबूब सर्जेखान

मोबाईल: ९५०३२९३६३६


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!