१ मार्चपासून नवीन नियम सिमकार्ड शिवाय वाॅटसअप बंद. -सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारचा मोठा निर्णय. 


१ मार्चपासून नवीन नियम सिमकार्ड शिवाय वाॅटसअप बंद. -सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारचा मोठा निर्णय.

पुणे प्रतिनिधी :

पुणे दि.:- देशात केंद्र सरकारने वाढत्या सायबर फसवणूक आणि डिजिटल तसेच गुन्हेगारीला देखील आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सिम-बाइंडिंग नियमांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.२८ फेब्रुवारी ची अंतिम मुदत देत नवीन नियमावली जाहीर करत सिमकार्ड वीना वाॅटसअप आता चालणार नाही संगणकावरून लाॅगींन केलेले लाॅगींन देखील सहा तासांत लाॅग आऊट होईल हा नियम १ मार्च पासून लागू होणार आहे तर २८ फेब्रुवारी ची अंतिम मुदत वाढवली जाणार नाही असे ही सांगण्यात आले आहे‌. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सुरक्षा हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याचे सांगत हे नियम बदलले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केले आहे की सिम-बाइंडिंग संदर्भातील नवीन नियम सरकार बदलणार नाही. महसूल किंवा व्यावसायिक परिणामांपेक्षा देशाची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले.

नवीन नियमांनुसार, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल यांसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्स वापरणाऱ्या डिव्हाइसमध्ये नोंदणी केलेले मूळ सिम प्रत्यक्ष सक्रिय असणे आवश्यक राहील. म्हणजेच, ज्या सिमवर खाते तयार केले आहे ते सिम फोनमध्येच असणे बंधनकारक असेल. यामुळे डिजिटल फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

तसेच, इंटरनेटवरील वेब सत्रांबाबतचा नियमही कायम राहणार आहे. सहा तासांपेक्षा जास्त वेळ चालणारे वेब सत्र आपोआप लॉगआउट केले जाईल. मात्र हा नियम मोबाइल अ‍ॅप्सवर नाही, तर व्हर्च्युअल किंवा वेब कनेक्शनवर लागू होईल.

दूरसंचार विभागाने (DoT) जाहीर केलेल्या या नियमांमुळे व्हॉट्सअ‍ॅप वेब सारख्या सेवांवर परिणाम होईल, कारण दर सहा तासांनी सत्र संपेल. मेसेजिंग अ‍ॅप्सना नोंदणीसाठी वापरलेले सिम डिव्हाइसमध्ये सक्रिय आहे की नाही, याची सतत पडताळणी करावी लागेल. सिम काढले, बदलले किंवा बंद केले तर संबंधित अ‍ॅप बंद होईल. सध्या मात्र बहुतांश ॶॅप्स ओटीपी द्वारे पडताळणी करतात.तसेच, भारतात उपग्रह सेवा सुरू करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आदेशानुसार कंपन्यांना १२० दिवसांच्या आत याबाबत अहवाल सादर करावा लागेल नियमांचे पालन न केल्यास दूरसंचार कायदा २०२३, दूरसंचार सायबर सुरक्षा नियम आणि इतर लागु कायद्यानुसार कारवाई केली जाईल‌‌.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!