विधान परिषदेत आरटीओ अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप 


 विधान परिषदेत आरटीओ अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्यावर गंभीर आरोप 

मुंबई: विधान परिषदेत आज ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आरटीओचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्याविरोधात अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत खळबळ उडवून दिली. कळसकर यांनी बदल्यांसाठी अनेक अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम मागितल्याचा तसेच शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा थेट आरोप परब यांनी केला.

बदल्यांसाठी ५० लाख रुपयांची मागणी

अनिल परब यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांनी त्यांच्या हाताखालच्या 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मागितले यापैकी 245 अधिकाऱ्यांनी कळसकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे. याशिवाय, कळसकर यांनी शेल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले असल्याचा आरोपही आमदार परब यांनी केला. परब यांनी सरकारला प्रश्न विचारला की, या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करणार?

‘ब्रह्मास्त्र’ कोण आहे? चौकशीची मागणी

अनिल परब यांनी भरत कळसकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कळसकर हे आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसे करायचे हे शिकवत असल्याचा आरोप परब यांनी केला. कळसकर यांनी आतापर्यंत 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे ते स्वतः सांगत असल्याचा दावाही परब यांनी केला. यासोबतच, “माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे,” असे कळसकर अधिकाऱ्यांना सांगत असल्याचा उल्लेख परब यांनी केला.

अनिल परब यांनी मागणी केली की, हे ‘ब्रह्मास्त्र’ कोण आहे, याची माहिती सरकारने तातडीने समोर आणावी. विधान परिषदेत भरत कळसकर यांच्यावर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे आरटीओ विभागात आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!