कष्टकर्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली
पुणे :हमाल, कचरा वेचक, रिक्षाचालक यांच्यासह असंघटीत कामगारांसाठी अनेक दशके लढा देऊन त्यांना त्यांचे हक्क मिळवून देणारे, कष्टकर्यांचे नेते डाॅ. बाबा आढाव यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली आहे.
पत्रकरांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या न्याय हक्कासाठीच्या प्रत्येक आंदोलनात बाबांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यांचे पत्रकरांशी ऋणानूबंध होतेच, पण आधारही होता. अशा या महान कामगार नेत्याचे निधन झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
– ब्रिजमोहन पाटील, अध्यक्ष, पुणे श्रमिक पत्रकार संघ
– शैलेश काळे, अध्यक्ष, पुणे पत्रकार प्रतिष्ठान
Views: 258































