“कोंढवा कौसर बागेत विजयाचा चौकार ; भ्रष्टाचाऱ्यांचे बारा वाजणार!”
प्रभाग १९ मध्ये प्रशांत दादांच्या चारीही शिलेदारांचा विजय आता काळ्या दगडावरची रेघ!
पुण्यातील राजकारणात सध्या अनेक ‘नटसम्राट’ वावरत आहेत, पण कोंढवा कौसर बाग प्रभाग १९ मध्ये जो भ्रष्टाचाराचा ‘प्रयोग’ गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे, त्याला आता कायमचा पडदा पाडण्याची वेळ आली आहे. ज्यांनी जनतेच्या विश्वासाचा बाजार मांडला, ज्यांनी विकासाच्या नावाखाली स्वतःची घरं भरली, त्या भ्रष्टाचाऱ्यांचे आता ‘बारा वाजल्याशिवाय’ राहणार नाहीत!
प्रशांत दादांचा विश्वास, जनतेचा पाठिंबा..!
अहो, राजकारण म्हणजे काय मस्करी वाटली की काय? जनतेला फसवून तुम्ही किती दिवस सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहणार? प्रशांत दादांनी आता विजयाचं जे रणशिंग फुंकलंय, त्याचे प्रतिध्वनी संपूर्ण कौसर बागेत घुमू लागले आहेत. दादांच्या मार्गदर्शनाखाली आमचे चारीही उमेदवार म्हणजे निव्वळ नावाचे उमेदवार नाहीत, तर ते भ्रष्टाचाराचा भस्मासुर गाडण्यासाठी निघालेले चार ‘रुद्र’ आहेत!
विजयाचा ‘चौकार’ ठरणारच…!
काही लोक म्हणतात, “एक-दोन जागा येतील.” अरे, त्यांना सांगा, डोळे चोळून नीट बघा! इथे एक-दोन नाही, तर ‘विजयाचा चौकार’ लागणार आहे. जेव्हा चारीही मुंडा अंगात करून आमचे शिलेदार मैदानात उतरले आहेत, तेव्हा विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली नसती तरच नवल!
“ज्यांनी कोंढव्याला समस्यांच्या गर्तेत लोटलं, त्यांना आता मतं मागण्याचा अधिकार उरला नाही. इथला प्रत्येक मतदार आता ‘बॅलेट बॉक्स’ मधून विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाला आहे.”
आता हिशोब होणार..!
कौसर बागेच्या गल्लीगल्लीत आता एकच चर्चा आहे – “भ्रष्टाचार हटवा, प्रभाग १९ वाचवा!” ज्यांनी पाच वर्षे जनतेला रडवलं, त्यांना आता रडवण्याची ताकद तुमच्या बोटात आहे. प्रशांत दादांच्या चारीही उमेदवारांना निवडून देणं, हा केवळ विजय नसेल, तर तो अन्यायाविरुद्धचा पुकार असेल.
अरे, हे लोक काय जनतेचे सेवक?
हे तर सत्तेचे चाकर! पण आता जनताच मालक होणार आणि या चाकरांना त्यांची जागा दाखवून देणार. आमचे चारही वाघ जेव्हा महापालिकेत डरकाळी फोडतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने कोंढव्याचा विकास होईल!”
लक्षात ठेवा… गुलाल आमचाच आणि विजयही आमचाच!




























