-आंधळ्या डोळ्यानी बघायचे काम करू नका आणि झाकलेल्या डोळ्यांनी काम करू नका:- माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे.
आदरणीय देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते पण गृहखाते हे निष्क्रिय व निकामी असल्याचे खंत व्यक्त :- ॶॅड. कैलास पानसरे

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे देहुरोड :
देहुरोड मध्ये २८ रोजी भाजपाचे सक्रिय कार्यकर्ता रमेश रेड्डी यांच्या गोळ्या घालून निर्घृणपणे खुन करण्यात आला होता २६ राऊंड फायर झाले त्यात ९ गोळी रमेश रेड्डी यांच्या शरीरात घुसली त्यात एक गोळी मस्तकात लागल्याने ते जागीच ठार झाले त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज दिनांक ३० रोजी रमेश रेड्डी यांचेअत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार देहूरोड च्या शितळानगर स्मशान भुमी पार पडला .

आज सकाळी ९ च्या सुमारास घरापासून अंत्ययात्रा हे निघाली यावेळी शहरातील दिग्गज नेते मंडळी सह हजारो नागरिक सहभागी झाले होते रमेश रेड्डी यांचे मित्र परिवार यांनी हंबरडा फोडत रडु लागले या ह्दय विकारक घटनेमुळे संपूर्ण शहरात शोकाकुल वातावरणात निर्माण झाले होते. अंतिम संस्कार झाल्यावर ॶॅड कृष्णा दाभोळे, संजय पिंजण, गोपाळराव तंतरपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत आदरांजली वाहिली या घटनेचे सर्वानी निषेध नोंदवत मनोगत व्यक्त केले भाजपाचे शहराध्यक्ष *रघुवीर शेलार* यांनी शहरात घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना आहे या अगोदर एक वर्षापूर्वी देखील रमेश रेड्डी यांच्या सख्ख्या भावाचा देखील असेच प्रकारचे निघृणपणे खुन करण्यात आला होता आता परत रमेश रेड्डी यांच्या देखील निघृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे पोलीसांनी झोपेचे सोंग न घेता उघड्या डोळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे या अंतिम संस्कारात उपस्थित राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांना मी विनंती करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या बाबत आपण चर्चा करावी व शहरात गुन्हेगारी वाढल्याने गुन्हेगारी बाबत मिटींग लावून काय उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करावी यावेळी पोलीस प्रशासनाला धारेवर धरत यापुढे शहरात अशी घटना घडता काम नये परत जर असे घटना घडली तर आम्ही सर्व पक्षीय व नागरिक मिळून मोठा आंदोलन करू रमेश रेड्डी वर २६ राऊंड फायरिंग झाले ९ गोळ्या लागले येवढे गोळ्या व पिस्तुल आले कुठून या गोष्टीचा पोलीसांनी शोध घ्यावा दोन दिवसांपूर्वी घटना घडल्या नंतर येथे एसीपी डीसीपी व इतर पोलीस अधिकारी पोलीस यंत्रणा दिसत आहे असा प्रश्न मी नाही नागरिक करत आहेत ज्या लोकांनी मला खंत व्यक्त केले ते मी इथे बोलत आहे एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींची निघृणपणे खुन होतो हे अत्यंत निंदनीय घटना आहे पोलीसांना याचा सुगावा लागला असेल कि नाही माहीत नाही किंवा पोलीस प्रशासन निद्रिस्त अवस्थेत आहेत का? असे नागरिकांच्या मनात येत आहे २० वर्षात गुन्हेगारी वाढली आहे पण या दोन वर्षांत गुन्हेगारी खुपचं जास्त प्रमाणात वाढली आहे आज गल्ली बोळात भाईगिरी करत तरुण हे रस्त्यावर तलवार ने केक कापून वाढदिवस साजरा करत आहे गाडीवरून तीन चार टोळके बसून कशी ही गाडी चालवत आहे हे गोष्टी प्रशासना पर्यंत पहुचत देखील असेल या गोष्टीवर योग कारवाई होत नसल्याने समाजात नुकसान मात्र नक्की होत आहे याबाबत पोलिसांनी एक चांगली मिटींग आयोजित करून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे मी या निघृण हत्येचा मी निषेध करतो शहरात अशी घटना घडणे म्हणजे शोकांतिका आहे असे तीव्र शब्दांत शहराध्यक्षानी प्रतिक्रिया व्यक्त केले. यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाचे मनोनित अधिकारी व भाजपाचे जेष्ठ नेते *ॶॅड. कैलास पानसरे* यांनी आदरांजली वाहत म्हणाले मागील १३ फेब्रुवारी २०२५ रोजी मृत रमेश रेड्डी यांच्या सख्खा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांची देखील हत्या करण्यात आले याची तीव्रता कमी होत नाही कि आता मोठा भाऊ रमेश रेड्डी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात येते मी याचा तीव्रपणे निषेध व्यक्त करतो शहरात असे प्रकार चे घटना घडणे म्हणजे शोकांतिका आहे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे राज्यात पोलीस प्रशासनावर अनेक ताशेरे ओढले जात आहेत राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या कडे गृहखाते आहे ते आमचे आदरनिय नेते देखील आहेत तसेच येथे उपस्थित माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे देखील उपस्थित आहेत त्यांना मी सांगू इच्छितो कृपा करून आपण गृहमंत्र्यांना सांगा देवेंद्र फडणवीस हे सर्व क्षेत्रांमध्ये चांगले काम करतात परंतु कायदा सुव्यवस्था बाबत गृहखाता हे निष्क्रिय व निकामी आहे असे मी खुलेआम सांगतो, कारण आज देहूरोड शहरात दहा दहा पिस्तुल येतात कुठून पोलीसांनी जर आंबेडकर नगर गांधीनगर पारशी चाळ व इतर ठिकाणी जर पोलीसांनी झडती घेतली तर सहज २० ते २५ पिस्तुल निश्चित सापडतील हे निश्चित पणे नक्की सांगतो, २०/२६ राऊंड फायरिंग करायला येवढे मोठ्या प्रमाणात पिस्तूल गोळ्या शहरात येतात कुठून हे कायदा सुव्यवस्था साठी चांगले लक्षणें नाहीत या गोष्टीचा मी निंदा व निषेध व्यक्त करतो असे तीव्र संतप्त प्रतिक्रिया पानसरे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी रमेश रेड्डी यांना आदरांजली वाहत म्हणाले रमेश रेड्डी हे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ता होता पक्षाच्या माध्यमातून अनेक काम करत होता देहूरोड शसरात कुठलेही संकट आले तर सर्व पक्षीय लोक एकत्रित येऊन लढा देतात अशी अनेक उदाहरणे आहेत रमेश रेड्डी हे नेहमी संपर्कात होता दिलेला काम प्रामाणिकपणे करत होता असे सक्रिय कार्यकर्ता ची हत्या होणे हे निंदनीय गोष्ट आहे या बाबत रमेश रेड्डी यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील याठिकाणी मी पोलीस प्रशासनाला सुचना करतो आंधळ्या डोळ्यानी बघायचे काम करू नका आणि झाकलेल्या डोळ्यांनी काम बघु नका या शहराचे अस्तित्व टिकवण्याचे असेल तर उघड्या डोळ्यांनी काम करा अशी सूचना यावेळी संजय उर्फ बाळा भेगडे यांनी पोलीस प्रशासनाला केले.
अंतवीधी संपल्यानंतर यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले या बाबत सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र बसुन चर्चा करणे गरजेचे आहे त्यासाठी उद्या बैठक घेतली जाणार आहे आता पर्यंत मारेकरी सापडले आहेत कि नाही याची माहिती घेतली जात आहे आता पर्यंत किती आरोपी अटक आहे हे ही माहिती घेत आहोत पोलीसांचे तपास सुरू आहे या बाबत आमचे शिष्टमंडळ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून न्यायाचे मागणी करू या घटनेची माहिती गृहमंत्री यांच्या निदर्शनास आणून देऊ व शहरात शांतता कशी राहील यासाठी प्रयत्न करू असे माध्यमांशी बोलताना सांगितले . यावेळी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता तर या अंत्यविधी समय कुठलेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्याचे परिमंडळ २ परिमंडळ ४ चे एसीपी डीसीपी सह दंगल नियंत्रण पथकसह मोठा फौजफाटा तसेच वाहतूक पोलीस असे मोठा फौजफाटा तैनात होता.


























