सावधान ! जिथे ‘दीपक’ विझवायचा प्रयत्न होतोय, तिथे आता क्रांतीचा वणवा पेटणार! कलेक्टर कचेरीवर चला!


सावधान ! जिथे ‘दीपक’ विझवायचा प्रयत्न होतोय, तिथे आता क्रांतीचा वणवा पेटणार! कलेक्टर कचेरीवर चला!

पुणे |  ज्या उत्तराखंडच्या देवभूमीत माणुसकीची पूजा व्हायला हवी, तिथे आज रक्ताच्या तहानलेल्या लांडग्यांनी उच्छाद मांडला आहे! एका असहाय्य मुस्लिम वृद्धाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करून उभा ठाकलेला ‘मोहम्मद दीपक कुमार’ हा तरुण आज अधर्माच्या आणि गुंडशाहीच्या विळख्यात अडकला आहे. पण या माणुसकीच्या शत्रूंना पुण्याचा इशारा आहे – सावधान! जर तुम्ही कोटद्वारचा हा दीपक विझवायला निघाला असाल, तर महाराष्ट्राच्या मातीत अन्यायाविरुद्धचा क्रांतीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही!

अन्यायाचा कळस : मुलीला शाळेतून काढले, पोटावर पाय दिला!

दीपक कुमारने काय केलं? एका म्हाताऱ्या माणसाचं दुकान वाचवलं. हाच का त्याचा गुन्हा? या गुंडशाहीने केवळ दीपकलाच नाही, तर त्याच्या चिमुरड्या लेकीलाही सोडलं नाही. तिला शाळेतून बाहेर काढणं, दीपकची जिम जबरदस्तीने बंद पाडणं आणि वरून पोलिसांच्या मदतीने खोट्या एफ.आय.आर.चा बनाव रचणं- हा कसला न्याय? ही तर सरळ सरळ लोकशाहीची हत्या आहे!

पत्रकारांची नाकेबंदी आणि गुंडांच्या धमक्या.!

कोटद्वारमध्ये आज पत्रकारांना प्रवेश बंदी आहे. सत्य जगासमोर येऊ नये म्हणून घातलेली ही बंदी म्हणजे सत्तेचा माज आहे. तिकडे बजरंग दलाचे गुंड दीपकला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत आणि इकडे प्रशासन डोळ्यावर कातडं ओढून बसलं आहे. पण लक्षात ठेवा, पुण्याची जनता या अन्यायाचा हिशोब विचारल्याशिवाय शांत बसणार नाही.

आता वेळ आली आहे रस्त्यावर उतरण्याची..!

दीपक कुमार आज केवळ एकटा लढत नाहीये, तो आपल्या सर्वांच्या माणुसकीसाठी लढतोय. आज त्याच्या कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळलं आहे. या संकटाच्या काळात आपण गप्प बसलो, तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही.

अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ‘मूलनिवासी मुस्लिम मंच’ या अन्यायाचा जाब विचारण्यासाठी सज्ज झाला आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज होणारे धरणे आंदोलन म्हणजे या सत्तेला दिलेला इशारा आहे.

लढाई माणुसकीची, लढाई हक्काची..!

स्थळ: पुणे जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर कचेरी)

वेळ: आज, शुक्रवार ६ फेब्रुवारी २०२६, दुपारी ३:३० वाजता.

आवाहन: चला, अन्यायाची साखळी तोडूया! दीपकच्या पाठीशी उभे राहूया!

पुणेकर हो, मोठ्या संख्येने उपस्थित राहा!

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!