एम बँकेची मोठी गुगली ; स्वतःचे विनिमय ओळखचिन्ह सुरू करणारी पहिली सहकारी बँक !


एम बँकेची मोठी गुगली ; स्वतःचे विनिमय ओळखचिन्ह सुरू करणारी पहिली सहकारी बँक !

पुणे : सकाळी दारात येणाऱ्या वृत्तपत्राच्या बिलापासून ते महिनाअखेरीस द्याव्या लागणाऱ्या घरभाड्याच्या मोठ्या रकमेपर्यंत, आजकाल सगळाच कारभार या हस्तध्‍वनीच्या काचेच्या पडद्यावर चालतो. पण या आधुनिक अदृश्य व्यवहारांनी सुख देण्याऐवजी माणसाचा जीव कधी कधी पुरता मेटाकुटीला आणला आहे. एका छोट्या व्यवहारासाठी चार वेगवेगळी उपयोजने उघडा, त्यांचे गुप्त संकेतांक लक्षात ठेवताना स्वतःचा वाढदिवस विसरण्याची वेळ यावी आणि त्यात भर म्हणून की काय, ‘छुपे शुल्क’ नावाचा एक अदृश्य खिसेकापू ग्राहकांच्या खिशाला नकळत कात्री लावत असतो! हा सगळा मनस्ताप आणि डोक्याला होणारा ताप कायमचा संपवण्यासाठी, आपल्या ‘एम बँके’ने थेट स्वतःचेच विनिमय ओळखचिन्ह @एमबँक मैदानात उतरवले आहे. स्वतःचे स्वतंत्र ओळखचिन्ह निर्माण करणारी ही देशातील एकमेव आणि पहिली अ-अनुसूचित नागरी सहकारी बँक ठरली आहे, हे ऐकून नक्कीच अभिमान वाटेल!

आज बाजारात मोठे मोठे शड्डू ठोकणाऱ्या अनेक आर्थिक-आधुनिक कंपन्या आणि बऱ्याच सहकारी बँका अजूनही दुसऱ्या मोठ्या धनकोषांच्या कुबड्या घेऊन, म्हणजेच त्यांच्या नावाच्या सावलीत आपले उखळ पांढरे करत आहेत. दुसऱ्याच्या दारात कशाला उभे राहायचे? हाच बाणा ठेवून एम बँकेने हा जुना साचा मोडीत काढला आणि स्वतःच्या पायावर उभे राहून आपली एक वेगळी स्वाभिमानी ओळख निर्माण केली. याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे! आता कट्ट्यावरील चहाची टपरी असो, भाजी विक्रेत्याची पाटी असो, मित्राला दिलेली उसने रक्कम असो की महिन्याचा किराणा; या सर्व व्यवहारांसाठी ग्राहकांना आता इतर कोणत्याही परक्या नावाचा आसरा घेण्याची अजिबात गरज नाही. एकच, डोक्यात चटकन बसणारे आणि थेट आपल्या बँकेचे स्वतःचे ओळखचिन्ह आता तुमच्या दिमतीला हजर आहे.

या नव्या सुविधेचे गुपित सांगताना बँकेचे अध्यक्ष श्री. तन्वीर इनामदार अत्यंत मिश्कीलपणे म्हणाले, “लोकांना आजच्या युगात हस्तध्वनीवरून पैसे पाठवायला नक्कीच आवडते, पण त्यात होणारा अकारण घोळ त्यांना नको असतो. सामान्य माणसाला सरळ, सोपे आणि खात्रीशीर व्यवहाराचे साधन हवे असते. आमचे हे नवीन ओळखचिन्ह अगदी सुरक्षित आणि सहज व्यवहारांची पूर्ण हमी देते.” हे ओळखचिन्ह सर्व प्रकारच्या विनिमय प्रणाल्यांवर सहज चालणारे असून, वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही व्यवहारांसाठी चटकन ओळखू येणारे आणि बँकेचा थेट विश्वास देणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

आज जेव्हा या आधुनिक धनविनिमयाच्या बाबतीत संपूर्ण जग भारताकडे तोंडात बोटे घालून पाहत आहे, अशा सुवर्णकाळात आपल्या एम बँकेने ग्राहकांना वेगवान आणि आधुनिक सेवा देऊन सहकार क्षेत्रात एक नवीनच आणि अत्यंत कौतुकास्पद पायंडा पाडला आहे. या सुविधेमुळे आता आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि आपुलकीचे झाले आहेत. हे नवीन ओळखचिन्ह आता सर्व ग्राहकांसाठी खुले झाले असून, बँकेचे हे पाऊल आधुनिक तंत्रज्ञानाची नाळ सामान्य जनतेच्या रोजच्या पाकिटाशी जोडणारे ठरेल यात तीळमात्र शंका नाही! व्यवस्थापनाचे मनापासून हार्दिक अभिनंदन!


48
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!