इचलकरंजीत ‘शहापूर विज्ञान नगरी’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन; २२ डिसेंबर रोजी उद्घाटन


इचलकरंजीत ‘शहापूर विज्ञान नगरी’ प्रदर्शनाचे भव्य आयोजन; २२ डिसेंबर रोजी उद्घाटन

इचलकरंजी: येथील महानगरपालिका शिक्षण विभाग आणि शहापूर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ‘शहापूर विज्ञान नगरी’ असे या प्रदर्शनाचे नाव असून, यंदाचा मुख्य विषय ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM’ हा आहे.

कार्यक्रमाचे महत्त्वाचे तपशील:

उद्घाटन: सोमवार, २२ डिसेंबर २०२५ (सकाळी १०:०० वाजता)

उद्घाटक: डॉ. विजय श्यामराव कुंभार (वरिष्ठ सहा. संशोधक, शिवाजी विद्यापीठ)

अध्यक्ष: सौ. सुषमा शिंदे-कोकले (अति. आयुक्त, इ.म.पा.)

बक्षीस वितरण: मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ (दुपारी ३:०० वाजता)

प्रमुख पाहुणे (समारोप): डॉ. महेश प्रल्हाद सूर्यवंशी (संशोधक, UNSW सिडनी, ऑस्ट्रेलिया)

समारोप अध्यक्ष: सौ. पल्लवी पाटील (आयुक्त तथा प्रशासक, इ.म.पा.)

प्रदर्शनाचे वैशिष्ट्य: या प्रदर्शनात इचलकरंजी व शहापूर परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे विद्यार्थी आपले नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आणि STEM शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

या प्रदर्शनास रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, टेक्स्टाईल सिटी आणि एक्झिक्युट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!