देहूरोड ऐतिहासिक धम्मभूमी येथे ७१व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. –


जेथे असाल तेथुन २५ डिसेंबरला ऐतिहासिक बुद्ध विहार येथे सगळ्यांनी या,संघपाल शिरसाट यांचे बोध बांधवांना आवाहन. –

देहूरोड प्रतिनिधी :

देहूरोड दि ‌:- ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड च्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त धम्मभूमी देहुरोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी देहूरोड च्या या पावन धम्मभुमीत म्यानमार (रंगुन) बर्मा देशातुन श्वेत (पांढऱ्या )रंगाचे डोळे उघडलेले जगातील एकमेव भगवान गौतम बुद्धांची मूर्ती देहूरोड येथे स्थापन केले दोन मुर्ती पैकी एक तळेगांव दाभाडे येथील निवासस्थानी ठेवले एक देहूरोड च्या धम्मभूमी येथे स्थापन केले म्हणून या भुमीला ऐतिहासिक धम्मभूमी म्हणून संबोधले जाते आज या गोष्टीला ७१ वर्ष पूर्ण होत आहे म्हणून वर्धापन दिनानिमित्त बुद्ध विहार कृती समितीच्या वतीने ऐतिहासिक धम्मभूमी वर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ८:०० वा. तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संगिता अशोक वाघमारे, अशोक वाघमारे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण होणार तर विदर्भ भिम सैनिकांचे स्वागत व सामुदायिक वंदना होणार , सकाळी ८:३० वा. विदर्भ भिम सैनिकाच्या वतीने विदर्भ धम्मभूमी सुरक्षा समितीचे अध्यक्ष संघपाल शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली महारॅली, सकाळी ९:०० वा‌. हिरा पुत्र भवार गुरूजी यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजारोहण तर यांचे स्वागत बुद्ध विहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष टेक्सास गायकवाड बुद्ध नेते प्रबुद्धरत्न प्रबुद्ध साठे, पश्चिम महाराष्ट्र चे प्रदेश महासचिव डॉ हुलगेश चलवादी, कोकण झोनचे प्रदेश महासचिव किरण अल्हाट हे करतील सुत्र संचालन अशोक सयाजी गायकवाड व डॉ किर्तीपाल गायकवाड तर आभार प्रकट बाबासाहेब सि गायकवाड हे करणार आहेत ,सकाळी ९:३० वा. प्रमुख धम्मगुरु महाबोधी भंते विनाचार्य हे महाबुध्द वंदना घेणार सकाळी १०:०० वा. विदर्भ भिम सैनिकांची धम्मभूमीला मानवंदना देणार, तर सकाळी ११:०० ते सायंकाळी ३:३० वा. महाबोधी महाविहार बुद्ध गया मुक्ती आंदोलन समर्थन चे उद्घाटन भंते विनाचार्य यांच्या हस्ते होणार यात प्रमुख वक्ते डी एस नरसिंगे ,विलास खरात, लक्ष्मण माने, पैगंबर शेख, विनोद राऊत मिलिंद तायडे, योगेश राऊत, राजेंद्र भालचंद्र, एड. वैशाली झाल्टे, रबुआ आंबेडकर, मंगलदास पडवेकर, सुरेश भालेराव हे वक्ते करणार आहे सायंकाळी ४:०० वा धम्म दिक्षा समारंभ व २२ प्रतिज्ञा ग्रहण शपथ भंते विनाचार्य देतील सांय. ४:३० वा. विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध पुरस्कार देण्यात येणार (प्रबुद्धरत्न :- राजाराम साहेब), (गान सम्राट:- आनंद शिंदे), (न्याय रत्न :- एड. सुनील डोंगरे), (वृत्तरत्न :- संजय आवटे), (प्रबुद्ध साहित्यरत्न :- डॉ सुभाष खंडारे), (शिवश्री क्रांती रत्न:- सतीश काळे), (समाज रत्न :- शिवश्री उत्तमराव कामठे), (धम्म रत्न:- जाॅली मोरे) ,(भीम रत्न:- प्रभाकर दादा कवडे), (भीम रत्न:- विजय तुकाराम गायकवाड), (भीम रत्न:- प्रज्ञा (गवळी) सोनवणे), (उद्योग रत्न:- अमोल ठोकले ) यांना प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी ४:०० वा. एकपात्री नाट्य *”में बुद्ध गया बोल रही हूं”* व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मभूमी वर दिलेले भाषण सादरीकरण होणार सायंकाळी ६:३० वा शिव भिम शाहीरा सीमा पाटील जाॅली मोरे यांच्या संगितमय नाट्य व भारतीय संविधानाची गौरव गाथा प्रस्तुत करतील असे २१,२२,२३, आणि २४ डिसेंबर दरम्यान प्रतिज्ञा पाठांतर निबंध, वक्तृत्व, एकपात्री नाट्य मुलांवर धम्म स़़ंस्कार कसे करावेत कवी संमेलन भिमशाहीर स्पर्धा मध्ये विजेत्यांना ५००० ते २५००० हजार रुपये पर्यंत चे बक्षिस देण्यात येणार आहे तर लहान मुलांवर धम्म स़़ंस्कार मध्ये १०००,७०० आणि ५०० रुपये चे बक्षिस, बहुजन महानायक नायिका नाट्य स्पर्धेत ३०००,२०००,१००० तर बालनाट्य स्पर्धेत ३०००,२०००,१००० निबंध स्पर्धेत ३०००,२०००,१००० असे बक्षीस देण्यात येणार आहेत, या कार्यक्रमात भोजन दान नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल, बाळासाहेब जाचक ,आनंद घोडके, जयदीप वाघमारे, रवींद्र गेडाम ,प्रवीण शिरसाट, नितीन खरात, प्रीती यशवंत गायकवाड, काळूराम सोनवणे, सुनील गायकवाड, कस्तुरबाई भवनाकुळ, संजय अंकुश, उस्मान भाई शेख, अशोक लक्ष्मण कांबळे, अनिल रणवरे, सोनू लक्ष्मण भालेराव, संदीप भालेराव, संतोष भालेराव, अविनाश भालेराव, मयूर गरुड, विनायक जगताप, निकाळजे राजू यांच्या वतीने भोजनदान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्था बुद्ध विहार कृती समिती अष्ट प्रधान मंडळ, धम्मभुमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभुमी महिला महासंघ, जेष्ठ उपासक संघ या सर्वांनी मिळून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. *विदर्भ धम्मभूमी सुरक्षा समितीचे अध्यक्ष संघपाल शिरसाट यांचे बोध बांधवांना आवाहन, जेथे असाल तेथुन २५ डिसेंबरला ऐतिहासिक धम्मभूमी देहुरोड येथे या. ————————— असे आवाहन संघपाल शिरसाट यांनी केले आहे

बाबासाहेबांनी आपल्या भाषणातुन बुद्ध विहार चे स्वप्न साकारले होते दिक्षा भुमी ,चैत्य भुमी व धम्मभूमी या त्रिवेणी संगम असलेला विहाराचे प्लान मंजूर करण्यात आले आहे विहाराचे विकास काम प्रगतीपथावर चालु आहे तरी सर्वांनी भारतातुन जेथे ही भिमसैनिक आहेत त्यांनी २५ डिसेंबरला आलेच पाहिजे असे आवाहन संघपाल शिरसाट यांनी केले आहे. विदर्भ मराठवाड्यातुन रेल्वेने बिल्ले लावुन मोफत येता येणार आहे तर गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीने ने निघायचं आहे अधिक माहिती साठी धम्म भुमी सुरक्षा समितीचे विदर्भ अध्यक्ष संघपाल शिरसाट यांच्याशी ९८२२३७४७३ या क्रमांकावर संपर्क साधावे असे ही आवाहन करण्यात आले आहे.


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!