पुणे मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ


पुणे मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ

पुणे : आगामी पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीत वाढ केली आहे.

काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज देण्याची आणि भरून जमा करण्याची मुदत दिनांक १५ आणि १६ डिसेंबर २०२५ असे आणखी दोन दिवस वाढविण्यात आली आहे.

अर्जाची प्रक्रिया आणि वेळ

कालावधी: १५ आणि १६ डिसेंबर २०२५ (सोमवार आणि मंगळवार)

वेळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

ठिकाण: पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे ५

या वाढीव कालावधीत इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेऊन व भरून वरील ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या पत्रकाद्वारे केले आहे. कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!