बाटली आडवी आणि मान ताठ; नशामुक्त भारतासाठी ‘प्रेस मीडिया’ने कसली कंबर!
पुणे : काय सांगावे या कलयुगाचे नवल? गल्लीबोळात दुधाच्या डेअरीपेक्षा दारूची दुकाने जास्त डौलाने उभी राहू लागली आहेत. तरुण पिढी संसाराची राखरांगोळी करून बाटलीत आपले भविष्य शोधू लागली असतानाच, पुण्याच्या मातीतून एक ‘मर्दाचा शब्द’ उमटला आहे! ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या आणि देशपातळीवर ओळखल्या जाणाऱ्या ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ या वृत्तसंस्थेने आता व्यसनासुराचा कोथळा बाहेर काढण्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियान’ जाहीर केले आहे.
अभिनय सांभाळून मांगूरे सर आता सामाजिक रणांगणात!
या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते महमद रफीक मांगूरे सर यांनी या कार्यासाठी आपले ‘विशेष सहकार्य’ जाहीर केले आहे! मांगूरे सर केवळ पडद्यावरच नटत नाहीत, तर आपला ‘अभिनय सांभाळून’ ते आता प्रत्यक्ष आयुष्यात ‘व्यसनमुक्तीचा महानायक’ म्हणून मैदानात उतरले आहेत. आपला कलावंताचा धर्म पाळतानाच समाजाला लागलेली ही व्यसनाची कीड उपटून काढण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. जेव्हा एखादा कलावंत असा ‘अभिनय सांभाळून’ सामाजिक कार्यात झोकून देतो, तेव्हा त्या मोहिमेला यश मिळणारच, याची आम्हाला खात्री आहे!
गाव होईल दारूमुक्त, तरच देश होईल सामर्थ्यवान!
नुसत्या बातम्या छापून कागद काळे करणारे पत्रकार आम्ही खूप पाहिले, पण ‘प्रेस मीडिया लाईव्ह’चे धाडस बघा! मांगूरे सरांच्या साथीने ही संस्था आता गावोगावी फिरणार आहे. ज्या गावांनी दारूला वेशीबाहेर काढून ‘दारूमुक्त’ होण्याचा पराक्रम केला आहे, अशा गावांचा आणि तिथल्या जिद्दी माणसांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. ज्या सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी बाटली आडवी केली, त्यांची मान आता समाजात ताठ होणार, हे नक्की!
नशामुक्त केंद्रांना भेट आणि कार्याची पावती!
समाजात नशामुक्तीची केंद्रे चालवणे म्हणजे जणू जळत्या निखाऱ्यावरून चालण्यासारखे आहे. ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची टीम आणि मांगूरे सर आता अशा केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन तिथल्या कार्याची माहिती घेणार आहेत आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून देणार आहेत. तसेच, वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचून तिथल्या निराधार जीवांच्या डोळ्यातील आसवे पुसण्याचे कामही ही टीम करणार आहे.
तरुणाईचा गौरव: नरकाकडून स्वर्गाकडे!
सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, जे तरुण नशेच्या नरकात अडकले होते, पण जिद्दीने त्यातून बाहेर पडले, अशा तरुणांचा सन्मान करून त्यांना समाजात मानाचे स्थान दिले जाणार आहे. याला म्हणतात ‘माणूस घडवणारी पत्रकारिता’ आणि ‘कलावंताचे खरे कर्तव्य’!
या महान कार्यात बाटली आडवी करताना अनेकांचे पोटात दुखेल, पण डगमगू नका! महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. चला, व्यसनाची जळमटं झटकूया आणि महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा ताठ करणार




























