इचलकरंजीत रंगणार गुणवंतांचा महासोहळा ; १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार करिअरचे सुवर्ण मार्गदर्शन !


इचलकरंजीत रंगणार गुणवंतांचा महासोहळा ; १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार करिअरचे सुवर्ण मार्गदर्शन !

इचलकरंजी : दि सोशल को-ऑप क्रेडिट सोसायटी, मुस्लिम वेल्फेअर फाउंडेशन आणि इचलकरंजी हज कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

इचलकरंजी, कबनूर, चंदूर, तारदळ, खोतवाडी आणि टाकवडे परिसरातील मुस्लिम समाजातील दहावी व बारावी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड, मार्कलिस्ट (झेरॉक्स), फोटो व मोबाईल नंबर रविवार दि. ३१/५/२०२६ पर्यंत खालील ठिकाणी जमा करावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरस्तरावर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

दस्तऐवज जमा करण्याची ठिकाणे :

१) दि सोशल को-ऑप क्रेडिट सोसायटी, साखरपे हॉस्पिटलसमोर, कालिका साऊंड गल्ली, इचलकरंजी.

२) इचलकरंजी हज हाऊस, चांदतारा मस्जिद मार्कज बाजार भाग, इचलकरंजी.

अधिक माहितीसाठी :

हाजी सादिक अब्दुल सत्तार जमादार – ९८९०९०९९३५

या उपक्रमासाठी ज. इम्रान हवेरी (नगरसेवक), ज. मुबारक मुजावर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.


कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!