तारदाळ येथे जल जीवन योजनेच्या. रखडलेल्या कामामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य…
तारदाळ खोतवाडी येथील जल जीवन योजनेचे काम तीन वर्षापासून रखडले असून अद्याप अपूर्ण अवस्थेत असून पाईपलाईन साठी रस्ते खोदून पाईपलाईनचे काम केले आहे.खोदलेले रस्ते व्यवस्थित न बुजवल्यामुळे रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले .असून त्यामुळे मोटरसायकल स्लीप होऊन अपघात होत असून त्यामुळे नागरिकांची व प्रवाशांची गैरसोय होतआहे.तसेच नागरिकांना रस्त्यावरून चालत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तारदाळ व खोतवाडी नागरिकांना स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी जल जीवन योजनेसाठी शासनाकडून 53 कोटी रुपयाचा निधी मंजूर असून या जलजीवन योजनेच्या दिरंगाईमुळे एका पाण्याच्या टाकी मधून सतरा विभागांना पाणी पुरवठा केला जातो आहे. एका विभागाला दहा ते बारा दिवसातून पाणी पुरवठा होत असल्यामुळे महिला वर्गाची पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
जल जीवन योजनेच्या दिरंगाईला जीवन प्राधिकरण अधिकारी व ठेकेदार जबाबदार असल्याने नागरिकाकडून तीव्र नाराजी पसरली आहे. तेव्हा संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे. अन्यथा संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या विरोधात रीतसर न्यायालयात दाद मागण्याची काही संघटना व नागरिकांची चर्चा सुरू आहे
पश्चिम महाराष्ट्र संपादक : श्रीकांत कांबळे





























