नशामुक्तीचा रणसंग्राम..! ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ विजेता प्रेस मीडिया लाईव्हचा अंमली पदार्थांवर जळजळीत प्रहार..!


नशामुक्तीचा रणसंग्राम..! ‘क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ विजेता प्रेस मीडिया लाईव्हचा अंमली पदार्थांवर जळजळीत प्रहार..!

 

पुणे | अहो, ज्या संस्थेच्या नावाचा डंका थेट क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये वाजला आहे, ती पुण्यातील आघाडीची वृत्तसंस्था ‘प्रेस मीडिया लाईव्ह’ आता गप्प कशी बसेल? समाजाला व्यसनाच्या नरकात सडताना पाहून, या संस्थेने आता ‘नशामुक्त भारत अभियान’ हाती घेतले आहे. हा केवळ कागदी घोडा नाही, तर तरुण पिढीच्या आयुष्यात प्रकाश पेरण्यासाठी पुकारलेला हा एल्गार आहे!

मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान सर यांच्या मार्गदर्शनाखाली वज्रमुठ..!

या लढाईत प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र संपादक श्रीकांत कांबळे यांच्या नियोजनाखाली महाराष्ट्राच्या मातीतील खंदे योद्धे एकत्र आले आहेत. सांगलीचे जिल्हा प्रतिनिधी अशोक मासाळ आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिस जमादार या जोडगोळीने जनजागृतीचा धडाका लावला आहे. सोबत डॉ. सलीम आळतेकर यांच्यासारखी अनुभवी माणसं आहेत. पिंपरी-चिंचवडचे चंद्रशेखर पात्रे, ज्येष्ठ उर्दू पत्रकार मुहमद जावेद मौला, कराटे प्रशिक्षक अली सय्यद सर, रायगडचे उपसंपादक सुनील पाटील, संपादक अब्दुल कय्युम सर औरंगाबाद ,  पत्रकार जैनोदीन पटेल नांदेड, डॉ. कुमार पाटील शिरढोण आणि बेळगावचे जिल्हा प्रमुख डॉ. विक्रम शिंगाडे ही फौज आता नशाखोरांचे धाबे दणाणून सोडण्यास सज्ज झाली आहे.

सिनेतारकांचा पाठिंबा आणि ‘रप्पाटा’ स्टाईल प्रहार!

या अभियानाला खरी धार चढली आहे ती कलाकारांच्या सक्रिय सहभागामुळे. ‘रप्पाटा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेते महमद रफीक मांगुरे सर यांनी या मोहिमेसाठी दिलेले विशेष सहकार्य हे या कार्याचे गांभीर्य अधोरेखित करते. प्रसिद्ध अभिनेत्री पद्मजा खटावकर यांच्या सहभागाने या मोहिमेला एक वेगळी सामाजिक उंची प्राप्त झाली आहे.

आता थेट नशामुक्ती केंद्रांवर धडक!

‘प्रेस मीडिया लाईव्ह’ची केवळ अग्रलेख लिहून थांबणारी नाही. मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांच्या प्रेरणेने रोजच्या जळजळीत बातम्यांतून सरकारला जागे केल्यानंतर, आता हे शिलेदार महाराष्ट्रातील विविध नशामुक्ती केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. तरुणांना नशेच्या विळख्यातून बाहेर काढून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू झालेला हा जोरदार प्रयत्न कौतुकास्पदच नाही, तर वंदनीय आहे!

 ही विशेष मोहीम आणि माहिती ‘प्रेस मीडिया लाईव्ह, पुणे’ यांच्या अधिकृत पुढाकाराने प्रसिद्ध करण्यात आली असून, क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधील त्यांच्या नोंदणीमुळे या सामाजिक कार्याची विश्वासार्हता जागतिक स्तरावर सिद्ध झाली आहे.

कृष्णा-पंचगंगा-दूधगंगा नदी खोऱ्यातील जलव्यवस्थापन, आंतरराज्यीय पाणी करार, प्रस्तावित ‘राधाकृष्ण’ उपसा योजना आणि शिरोळ तालुक्यातील दानवाड पंचक्रोशीवरील तांत्रिक व पर्यावरणीय परिणाम: एक सर्वसमावेशक संशोधन अहवाल

42
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!