अन्यायाचा अंधार सरला , आता भगिनींच्या सन्मानाचा ‘श्रीकृष्ण’ अवतार धरला.!


अन्यायाचा अंधार सरला , आता भगिनींच्या सन्मानाचा ‘श्रीकृष्ण’ अवतार धरला..!

मावळ प्रतिनिधी :

ज्या भूमीत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले, ज्या भूमीत जिजाऊंच्या संस्कारांचा सुगंध दरवळतोय, त्याच मावळच्या मातीत आज पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू लागले आहेत! राजकारण गेले तेल लावत, पण जेव्हा माय-बहिणींच्या अस्मितेचा आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा सह्याद्रीच्या कडा कडांमधून एकच आवाज घुमतोय… आणि तो आवाज म्हणजे श्रीकृष्ण आण्णासाहेब भेगडे!

हा निवडणुकीचा जुमला नाही, हा रक्ताचा नातलग आहे!

“निवडणुका येतात आणि जातात, पण जो संकटाच्या काळात आपल्या भगिनींच्या पाठीशी ढाल बनून उभा राहतो, तोच खरा मर्दाचा बच्चा!” श्रीकृष्ण भेगडे यांनी केवळ मते मागण्यासाठी हात जोडले नाहीत, तर त्या हातांना काम देण्यासाठी ‘कौशल्य विकासाचे’ शस्त्र दिले आहे.

काय आहे हा ‘श्रीकृष्ण’ संकल्प..?

शब्दांना फुटणार धार: ग्रामीण भागातील भगिनींनी इंग्रजी बोललेलं काही लोकांना खपत नाही, पण भेगडेंनी ठणकावून सांगितलंय – माझी बहीण आता ‘इंग्लिश’मध्ये संवाद साधणार आणि जगाला आपली ताकद दाखवणार!

घराघरांत लक्ष्मीची पावले : केवळ चूल पेटवून भागत नाही, तर ती चूल कायमची धगधगती राहण्यासाठी ‘गृहउद्योगाचे’ बाळकडू त्यांनी दिले आहे. आता प्रत्येक माता-भगिनी स्वतःच्या पायावर उभी राहणार.

गती आणि प्रगती : पदराचा टोक खोचून आता माझी माता दुचाकी आणि चारचाकीचे स्टेअरिंग फिरवणार! मोफत प्रशिक्षणातून त्यांनी दिलेला हा आत्मविश्वास म्हणजे प्रगतीचा हायवेच आहे.

कमळाचा विजय , हाच नारीशक्तीचा उदय!

लोकहो, शनिवार, ७ फेब्रुवारी विसरू नका! ही निवडणूक केवळ एका उमेदवाराची नाही, तर ती आपल्या घरातील सन्मानाची आहे. अनुक्रमांक ०२ समोरचे बटण दाबा आणि श्रीकृष्ण आण्णासाहेब भेगडे यांना इतक्या प्रचंड बहुमताने विजयी करा की, विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली पाहिजे!

 

 


32
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!