राळेगणचा ‘बॅटरी’ बाबा ! राजकीय पक्षांसाठी उपोषणाचं चार्जिंग, पण जनतेच्या प्रश्नांवर मात्र ‘डिस्चार्ज’!


राळेगणचा ‘बॅटरी’ बाबा ! राजकीय पक्षांसाठी उपोषणाचं चार्जिंग, पण जनतेच्या प्रश्नांवर मात्र ‘डिस्चार्ज’!

नमस्कार..!

मराठी साहित्यात आणि राजकारणात आम्ही अनेक नमुने पाहिले, पण अण्णा हजारे नावाचं जे काही ‘आंदोलनी रसायन’ राळेगणच्या मातीत तयार झालं, त्याची सर कोणालाच येणार नाही! अहो, हे अजब रसायन असं आहे की, सत्तेची समीकरणं बदलायची असतील तर या रसायनातून ‘उपोषणाचा’ धूर निघतो आणि जेव्हा सर्वसामान्य जनतेच्या पोटाला महागाईची झळ लागते, तेव्हा हे रसायन एकदम ‘मौन’ धारण करून बसतं!

हा जनतेच्या संतप्त प्रतिक्रियांतून तयार झालेला ‘जन-आवाज’ आहे.!

आज महाराष्ट्रातील आणि देशातील जनता विचारतेय, अण्णा नक्की कोणाचे? अहो, हे आम्ही म्हणत नाही, तर महाराष्ट्रातील जनता आज पोटतिडकीने बोलत आहे. प्रस्तुत लेख हा जनतेच्या विविध स्तरांतून उमटलेल्या संतप्त प्रतिक्रियांतून आणि जनसामान्यांच्या तीव्र भावनांतून तयार झालेला एक आरसा आहे. वास्तव आता सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ झालं आहे— अण्णा हजारे हे जनतेसाठी उरलेलेच नाहीत, ते फक्त राजकीय पक्षांच्या सोयीसाठी शिल्लक राहिले आहेत! अण्णांच्या आंदोलनाची सर्व सूत्रं आता राजकीय पक्षांच्या सोयीनुसार हलतात की काय, अशी शंका या संतप्त प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे.

अण्णांची चळवळ आणि वळवळ फक्त राजकारणासाठी..!

अण्णांचे उपोषण आणि त्यांचं मौन हे नेहमीच ठराविक राजकीय पक्षांच्या फायद्याचे ठरले आहे. आज लोकांच्या हे प्रकर्षाने लक्षात आलंय की, अण्णांची ही चळवळ आणि त्यांची ही आंदोलनी वळवळ ही फक्त आणि फक्त राजकारणासाठीच उरली आहे! जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा राजकीय समीकरणं कशी बसवता येतील, यातच अण्णांची ऊर्जा खर्च होत असल्याचे चित्र दिसत आहे. जेव्हा एखादा राजकीय लाभ पदरात पाडून घ्यायचा असतो, तेव्हाच अण्णांच्या अंगात उपोषणाचे वारं संचारतं का? हा जनतेचा जळजळीत सवाल आहे.

महागाईचा वणवा आणि अण्णांचे सोयीचे मौन

आज देशात महागाईने असा काही अक्राळविक्राळ वणवा पेटवला आहे की सामान्य माणसाच्या जगण्याचं पार कोळसं झालंय. गॅस, पेट्रोल आणि अन्नाचे भाव गगनाला भिडलेत. पण महाराष्ट्रातील जनतेच्या या किंकाळ्या अण्णांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत. जनतेच्या प्रश्नांशी अण्णांना आता काडीचंही देणं-घेणे उरलेलं नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया आज सर्वत्र उमटत आहेत. जेव्हा देशात खऱ्या प्रश्नांवर रान पेटतं, तेव्हा राळेगणसिद्धीत अलिप्त राहून बसणं ही त्यांची ‘ढोंगी नैतिकता’ आहे, असं आज जनताच उघडपणे बोलू लागली आहे.

“जनतेच्या चुली विझल्या तरी अण्णांना काही वाटत नाही,

कारण त्यांच्या आंदोलनाची बॅटरी आता फक्त राजकीय पक्षांसाठी चार्ज होते!”

वैचारिक विसंगतीची शोकांतिका

स्वतःला राजकारणापासून दूर म्हणवणारे अण्णा नेहमीच आपल्या ‘सोयीनुसार’ प्रकटतात. अण्णांची चळवळ ही आता फक्त स्वतःचं ‘महात्म्य’ टिकवून ठेवण्याची एक धडपड उरली आहे. जनतेच्या भावनांचा आणि त्यांच्या संतापाचा असा वापर करणं, ही मोठी ‘वैचारिक विसंगती’ आहे, ही भावना आज जनसामान्यांमध्ये घर करून बसली आहे.

अण्णा, आता तुमचं हे ‘सोयीचं शांत राहणं’ जनतेनं पार ओळखून घेतलंय. तुमची नैतिकता आता फक्त सत्तेच्या समीकरणांपुरतीच मर्यादित राहिली आहे, हीच आजची परखड वस्तुस्थिती महाराष्ट्राचा सामान्य नागरिक आज पोटतिडकीने मांडत आहे!

तूर्तास इतकेच!


47
कृपया वोट करा

प्रेस मीडिया लाईव्हच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!