गोळीबाराच्या घटनामुळे परिसरात एकच खळबळ पोलीस घटनास्थळी दाखल
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड :- देहूरोड शहर हे परत एकदा गोळीबाराच्या घटनामुळे हादरले आहे देहूरोड मध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास देहुरोडच्या पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय येथे घडली यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव रमेश रेड्डी वय ४३ राहणार देहूरोड असं आहे. या पुर्वी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रमेश रेड्डी यांचा भाऊ विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचे देखील गांधीनगर येथे गोळी झाडून हत्या करण्यात आले होते आता परत रमेश रेड्डी यांच्या वर गोळीबार झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी हे रात्री ८:३० ते ९:०० च्या दरम्यान काही कामानिमित्त बाजारपेठ च्या दिशेने गेले असता यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यात एकामागोमाग एक असे नऊ राऊंड फायर करण्यात आलेची माहीत समोर आली आहे, यातील एक गोळी हाताला तर एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे-मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपा नंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आला, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण अजुन समोर आलेला नाही मारेकरी कोण आहेत याचा पत्ता लागलेला नाही या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटने नंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे-मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. देहुरोडला गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी अवस्थेतील रमेश रेड्डी यांना रुग्णालयात नेलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबारामुळं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरुन एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती देखील डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते? कोणत्या हेतूनं रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झाला, या सर्व गोष्टींचा तपास देहूरोड पोलीस करत आहे.





























